ETV Bharat / bharat

तामिळनाडू विधानसभा निवडणूक : भाजपा लढवणार २० जागा

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी याबाबत माहिती दिली. "तामिळनाडूमध्ये एनडीएतर्फे भाजपा निवडणूक लढवणार आहे. २० मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आपले नशीब आजमावतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन हे धारापुरममधून, तर वरिष्ठ नेते एच. राजा काराईकुडीमधून निवडणूक लढवणार आहेत." असे अरुण म्हणाले...

author img

By

Published : Mar 14, 2021, 4:48 PM IST

BJP to contest on 20 seats as NDA partner in Tamil Nadu
तामिळनाडू विधानसभा निवडणूक : एनडीए लढवणार २० जागा; भाजपाची माहिती

चेन्नई : तामिळनाडूमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी २० जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजपा याठिकाणी निवडणूक लढवणार आहे. भाजपा एआयएडीएमकेसोबत मिळून ही निवडणूक लढवणार आहे.

२० जागांवर लढणार भाजपा..

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी याबाबत माहिती दिली. "तामिळनाडूमध्ये एनडीएतर्फे भाजपा निवडणूक लढवणार आहे. २० मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आपले नशीब आजमावतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन हे धारापुरममधून, तर वरिष्ठ नेते एच. राजा काराईकुडीमधून निवडणूक लढवणार आहेत." असे अरुण म्हणाले.

वनाती आणि कमल आमने-सामने..

भाजपाच्या महिला प्रमुख वनाती श्रीनिवासन या कोईंबतूर दक्षिणमधून निवडणूक लढवतील. एमएनएमचे प्रमुख कमल हासनदेखील याच मतदारसंघातून उभे आहेत. तर, अभिनेत्री खुशबू सुंदर या चेन्नईतील थाउजंड लाईट्स मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचा : दीदींना आव्हान देणाऱ्या सुवेंदु अधिकारींची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रात माहिती उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.