ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल निवडणूक : अभिनेता यश दासगुप्ता यांचा भाजपात प्रवेश - अभिनेता यश दासगुप्ता

अभिनेता यश दासगुप्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया दासगुप्ता यांनी दिली. यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे.

अभिनेता यश दासगुप्ता
अभिनेता यश दासगुप्ता
author img

By

Published : Feb 21, 2021, 4:12 PM IST

कोलकाता - यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपाचा हात धरला आहे. तर यातच अभिनेता यश दासगुप्ता यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया दासगुप्ता यांनी दिली.

राज्य आणि देशात बदल गरजेचा आहे. त्यामुळे व्यवस्थेच्या बाहेर राहून काहीच केले जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थेचा एक भाग होणे गरजेचे आहे. निवडणुकीत सामील होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ते म्हणाले.

तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत यांच्या मैत्रीबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, की आम्ही दोघेही आपआपल्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांनी एकाच मार्गावर चालावं. हे गरजेचे नाही.

भाजपात प्रवेश केल्यानंतर अभिनेता यश दासगुप्ता यांची प्रतिक्रिया

राज्यात बेरोजगारी -

बंगालमध्ये नोकऱ्या नसून राज्यात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. युवक रोजगाराच्या शोधात दुसऱ्या राज्यात जात आहेत. यामुळे बंगाल पीछाडीवर पडले आहे, असे ते म्हणाले. तसेच आपले काम आणि राजकारण दोन्हीमध्ये संतुलन ठेवले, असेही त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल निवडणूक -

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.