ETV Bharat / bharat

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात सामिल झाले आहेत. भाजपा गेल्या काही दिवसांपासून एका प्रसिद्ध चेहऱ्याच्या शोधात होती.

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश
अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश
author img

By

Published : Mar 7, 2021, 1:32 PM IST

Updated : Mar 7, 2021, 2:15 PM IST

नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर भव्य रॅली झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात सामिल झाले. मिथून चक्रवर्ती यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपला किती फायदा होतो, हे पाहण औत्सुक्याचे ठरेल.

Actor Mithun Chakraborty joins BJP in PM's rally
अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा राजकीय प्रवास

गेल्या 16 फेब्रुवारीला मिथून चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.

मिथून चक्रवर्ती राज्यसभेत टीएमसीकडून खासदार होते -

2011 मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसमधून पश्चिम बंगालकडून राज्यसभेत खासदार राहिले आहेत. मात्र ते राजकारणात फार रमत नसल्याचं दिसत होतं. शारदा चिट फंड प्रकरणात नाव आल्याने अवघ्या दोन वर्षातच त्यांनी राज्यसभा सभागृहाचा राजीनामा दिला. मिथून चक्रवर्ती हे सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. गेली अनेक वर्षे सेलिब्रेटी राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होईल.

पहिला टप्पा - 27 मार्च

दुसरा टप्पा - 1 एप्रिल

तिसरा टप्पा - 6 एप्रिल

चौथा टप्पा - मतदान 10 एप्रिलला

पाचवा टप्पा - मतदान 17 एप्रिल

सहावा टप्पा - मतदान 22 एप्रिल

सातवा टप्पा - मतदान 26 एप्रिलला

आठवा टप्पा - मतदान 29 एप्रिलला पार पडेल

Last Updated : Mar 7, 2021, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.