ETV Bharat / bharat

Umesh Pal Murder Case : उमेश पाल हत्येतील आरोपीचा अखिलेश यादव सोबत फोटो व्हायरल, आरोपीला अटक - प्रयागराज उमेश पाल खून प्रकरण

पोलिसांनी प्रयागराजमध्ये एका तरुणाला अटक केली आहे. उमेश पाल हत्येचा कट या तरुणाच्या खोलीतच रचला गेला होता. विशेष म्हणजे, या तरुणाचा सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ईटीव्ही भारत या व्हायरल फोटोला दुजोरा देत नाही.

Umesh Pal Murder Case
आरोपीचा अखिलेश यादव सोबत फोटो
author img

By

Published : Feb 28, 2023, 10:38 AM IST

प्रयागराज (उ. प्रदेश) : उमेश पाल खून प्रकरणात पोलिसांनी सोमवारी एका आरोपीला चकमकीत ठार केले. तसेच हा कट ज्याच्या खोलीत रचला गेला त्या तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या मुस्लिम बोर्डिंग हॉस्टेलचा विद्यार्थी नेता शदाकत खान याला अटक केली आहे.

आरोपीचा अखिलेश यादवसोबत फोटो व्हायरल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खळबळजनक घटनेचा कट शदाकत याच्या खोलीत रचण्यात आला होता. यावेळी पोलिसांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात शदाकत हा दुभाजकाला धडकल्याने जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शदाकत खानला अटक केल्यानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तो समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत दिसतो आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत हा व्हायरल फोटो एका कार्यक्रमातील आहे. आरोपीने अखिलेश यादव यांच्यासोबत उभा राहून हा फोटो क्लिक केला आहे. यासोबतच आरोपीच्या गळ्यात समाजवादी पक्षाचा स्कार्फही दिसतो आहे. यावरून त्याने पक्षाचे सदस्यत्व घेतल्याचे कळते आहे.

हत्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला : या व्हायरल फोटोमध्ये आरोपी शदाकतसोबत सपामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा रिचा सिंगही उभ्या असल्याच्या दिसत आहेत. या प्रकरणी रिचा सिंहने ईटीव्ही भारतला फोनवर सांगितले की, हा फोटो तीन ते चार वर्षे जुना आहे. एवढेच नाही तर या फोटोसोबत आणखी एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माजी खासदार व बाहुबली नेते अतिक अहमद यांचा धाकटा मुलगा अली अहमद याच आरोपीसोबत दिसतो आहे. सध्या अली हा खंडणी व धमकावल्याप्रकरणी नैनी मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. शनिवारी अखिलेश यादव यांनी उमेश पाल याच्या हत्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण आता अखिलेश यादव यांचेच छायाचित्र आरोपीसोबत व्हायरल झाल्याने ते स्वतःच त्यांनी दिलेल्या वक्तव्यात अडकल्याचे दिसत आहे.

आरोपीला छापा टाकून अटक : सोमवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीच्या घटनेची माहिती देताना पोलीस आयुक्त रमित शर्मा म्हणाले की, या घटनेत सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गाझीपूर येथील रहिवासी शदाकत याच्या वसतिगृहातील खोलीत या घटनेचा कट रचण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत पोलिसांना अनेक महत्त्वाचे घागे मिळाले आहेत.

हल्लेखोरांवर 50 हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस : पोलिसांनी छापा टाकताच त्यांच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आरोपी दुभाजकावर आदळला. त्यामुळे त्याला दुखापत झाली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. ही खळबळजनक घटना घडवून आणणाऱ्या सर्व हल्लेखोरांवर 50 हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले. पोलिस आयुक्त म्हणाले की, डीसीपी आणि अतिरिक्त सीपी यांच्या स्तरावरून आरोपींवर बक्षीस जाहीर केले जाते.

हेही वाचा : Khagaria Unique Marriage : पतीने घेतला बदला.. पत्नीच्या बॉयफ्रेंडच्या बायकोशीच केलं लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.