रांची - झारखंड राज्यात अवैध खाणकाम करत असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चौघांचा मृत्यू झाला आहे. अभ्रकच्या खाणीत उत्खनन करत असताना ही दुर्घटना घडली. मातीखाली दबून चौघा व्यक्तींची मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. कोडरमा जिल्ह्यात ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत २ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर इतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले आहे.