हैदराबाद - कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेढलेले आहे. त्यामुळे रोजच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम झालेला आहे. भुकबळींची संख्या वाढत आहे. 'अन्न सुरक्षा जागतिक अहवाल २०२१' मधील माहितीनुसार हिंसक संघर्ष, हवामानाचे संकट आणि कोरोनामुळे झालेले संकट या कारणांनी वर्ष २०२० मध्ये कमीत कमी १५.२० कोटी लोकांना अन्न असुरक्षेचा सामना करावा लागला आहे.
'अन्न सुरक्षा जागतिक अहवाल २०२१' मध्ये अन्न संकटाबाबत वैश्विक नेटवर्कच्या अभ्यासात ५५ देशांमधील स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या भुकबळी एवढी यंदा नोंद झाली आहे.
हेही वाचा-रेमडेसिवीरचा १६ मे रोजीपर्यंत देशात पुरेसा पुरवठा करणार- सदानंद गौडा
काय म्हटले आहे अहवालात?
- आफ्रिकेतील देशांमध्ये विषमता आहे. या देशांमध्ये हिंसक संघर्षामुळे १० कोटी लोकांना खाण्यासाठी पुरेसा आहार नाही. त्यामुळे त्यांचे जीवन आणि उदरनिर्वाह संकटात आहे.
- ३८ देश व इतर क्षेत्रांमध्ये सुमारे २.८० कोटी लोकांना पोषक आहाराच्या कमतरतेमुळे संघर्ष करावा लागत आहे.
- ते कुपोषणाचे बळी ठरण्याच्या टप्प्याजवळ पोहोचले आहेत.
- वर्ष २०२० मध्ये ९.८० कोटी लोकांकडे खाण्यासाठी पुरेसे जेवण नव्हते. त्यामुळे त्यांच्या जीवनावर जोखीम निर्माण झाली आहे. अशा संकटाचा सामना करणाऱ्या तीन पैकी दोन व्यक्ती हे आफ्रिका खंडामधील आहेत.
- जगाच्या इतर भागांमध्येही स्थिती वाईट आहे. यमन, अफगाणिस्तान, सीरिया आणि हैती या देशांना अन्न संकटांना गतवर्षी सामना करावा लागला होता.
हेही वाचा-सेंट्रल व्हिस्टाच्या प्रकल्पात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
१४ कोटींहून अधिक लोकसंख्येला अन्नाची असुरक्षा-
अन्न सुरक्षा जागतिक अहवाल २०२१ हा संयुक्त राष्ट्र, युरोपियन संघ आणि सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांनी तयार केला आहे. गेल्या पाच वर्षातील ३९ देश व क्षेत्रांमध्ये अन्न संकट ओढवले होते. या देश व राज्यांमधील अन्नाची असुरक्षा वर्ष २०१६ मध्ये ९ कोटी ४० लाख लोकांना भेडसावत होती. हे प्रमाण वाढून २०२० मध्ये १४ कोटींहून अधिक लोकसंख्येला अन्नाची असुरक्षा भेडसावत आहे. यामधील ५५ देश आणि क्षेत्रांमध्ये पाच वर्षांहून कमी असलेल्या साडेसात कोटी मुलांमध्ये अशक्तपणा आहे. तर दीड कोटी मुलांमध्ये अशक्तपणा असल्याचे २०२० मध्ये आढळले आहे.