ETV Bharat / bharat

AAP MP Sanjay Singh On ED Remand : आप खासदार संजय सिंह यांना पाच दिवसाची ईडी कोठडी - संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ

AAP MP Sanjay Singh On ED Remand : आपचे खासदार संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या सिंग यांना ईडीने न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयानं पाच दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे.

AAP MP Sanjay Singh On ED Remand
AAP MP Sanjay Singh On ED Remand
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 5:53 PM IST

Updated : Oct 5, 2023, 10:13 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांना ईडीनं गुरुवारी न्यायालयात हजर केलं. बुधवारी 10 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर पोलीस यंत्रणेनं त्याला अटक केली. यानंतर आप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.

  • #WATCH | AAP MP Sanjay Singh brought to Delhi's Rouse Avenue court

    Singh was arrested yesterday evening following the ED raid at his residence in connection with the Delhi excise policy case. pic.twitter.com/LuHyWtVAYp

    — ANI (@ANI) October 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था : कडेकोट सुरक्षेत राऊस एव्हेन्यू कोर्टात पोहोचलेले संजय सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरत आहेत, म्हणूनच मोदी अन्याय करत आहेत. न्यायालयाबाहेर प्रचंड गर्दी पाहून ईडीनं सिंग यांना दुसऱ्या गेटमधून आत नेलं. न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

'हा' आहे संजय सिंह यांच्यावर आरोप : खासदार संजय सिंह यांच्यावर दिल्लीतील दारू घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार मद्य व्यावसायिक दिनेश अरोरा यांनी दिल्लीतील आगामी निवडणुकांसाठी पक्ष निधी गोळा करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली होती. सिंह यांनी उत्पादन शुल्क विभागाकडं प्रलंबित असलेला अरोरा यांचा प्रश्न सोडवल्याचाही आरोप आहे. सिंह हे आपचे दुसरे मोठे नेते आहेत ज्यांना ईडीने अटक केली आहे. याआधी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या प्रकरणी फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत.

'आप'ला मोठा झटका : मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर संजय सिंह हे आम आदमी पक्षातील अरविंद केजरीवाल यांच्यानंतरचे दुसरे मोठे नेते आहेत. संजय सिंह हे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश-बिहारमध्ये पक्षाची धुरा त्यांच्याकडं आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत आम आदमी पक्षाचा चेहरा आणि समन्वय राखण्याची जबाबदारीही त्यांच्याकडं आहे. संजय सिंह यांच्या अटकेमुळे 'आप'ला मोठा झटका बसलाय.

हेही वाचा -

  1. Sanjay Singh : आप नेत्याच्या दाव्याला ईडीचा विरोध! आरोपपत्रात एक जागा हटवली जाणार, तीन ठिकाणी नाव कायम
  2. ED Arrest AAP MP Sanjay Singh : 'आप'ला मोठा झटका; दारू घोटाळा प्रकरणी खासदार संजय सिंह यांना अटक
  3. Lalu Yadav Bail : जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव व कुटुंबियांना जामीन मंजूर

Last Updated : Oct 5, 2023, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.