ETV Bharat / bharat

Gopal Italia : गोपाल इटालिया 'आप'चे नवे महाराष्ट्र सहप्रभारी - गुजरातचे नवे प्रदेशाध्यक्ष

विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने आपली नवी संघटना स्थापन केली आहे. पक्षाने नव्या संघटनेत मोठे बदल केले आहेत. 'आप'ने गोपाल इटालिया (Aam Aadmi Party leader Gopal Italia) यांची महाराष्ट्राच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करून त्यांना गुजरातमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (sah prabhari of Maharashtra AAP). (Gopal Italia to be sah prabhari of Maharashtra AAP).

Gopal Italia
गोपाल इटालिया
author img

By

Published : Jan 4, 2023, 5:10 PM IST

अहमदाबाद : आम आदमी पक्षाने गोपाल इटालिया (Aam Aadmi Party leader Gopal Italia) यांची महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून निवड केली आहे. (sah prabhari of Maharashtra AAP). यासोबतच गोपाल इटालिया यांना आपचे राष्ट्रीय सहसचिव बनवण्यात आले आहे. (Gopal Italia to be sah prabhari of Maharashtra AAP). तसेच इसुदान गढवी यांची गुजरातचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने वेगवेगळ्या झोनमध्ये सहा कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

इटालिया यांना गुजरातमधून बाहेरचा रस्ता : गोपाल इटालिया यांची महाराष्ट्राच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करून पक्षाने त्यांना गुजरातमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. यामध्ये इसुदान गढवी यांना गोपाल इटालिया यांच्यापेक्षा चौपट मते अधिक मिळाली होती. याच्या आधारावर पक्षाने गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले होते.

गुजरातमध्ये नवी पक्ष संघटना : विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने आपली नवी संघटना स्थापन केली आहे. पक्षाने नव्या संघटनेत मोठे बदल केले आहेत. त्यानंतर आम आदमी पार्टीने इसुदान गढवी यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. याशिवाय अल्पेश कथिरिया आणि चैतर वसावा यांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आगामी गुजरात निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे.

'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा : आम आदमी पक्षाचे आमदार चैतर वासवान यांच्याकडे दक्षिण विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष, डॉ. रमेश पटेल यांच्याकडे उत्तर गुजरात, जगमल वाला सौराष्ट्र, ज्वेल वासरा मध्य गुजरात आणि कैलाश गढवी यांच्याकडे कच्छ झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने नुकतीच गुजरात विधानसभा निवडणूक लढवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला आहे. गुजरातमधून आम आदमी पक्षाने विसावदार, गरियाधर, जामजोधपूर, बोताड आणि डेडिया पाडा या जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आता आम आदमी पक्ष आगामी विविध राज्यांच्या निवडणुका देखील लढवणार आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव : नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत गोपाल इटालिया सुरत शहरातील कटरगाम जागेवरून पराभूत झाले होते. कटरगाम विधानसभा मतदारसंघात भाजपचे विनू मोरडिया यांनी त्यांचा मोठ्या अंतराने पराभव केला होता. विनू मोरडिया यांना १२०३४२ तर गोपाल इटालिया यांना ५५७१३ मते मिळाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.