ETV Bharat / bharat

क्रुरतेचा कळस..! 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी एका महिलेला तिच्याच मुलाचे मांस खायला दिले - isis made mother eat her child

'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी एका महिलेला तिच्याच मुलाचे ( ISIS made mother eat her child ) मांस खायला दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इराक देशातील खासदार विआन दाखिल यांनी दिले. त्यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 1, 2022, 1:23 PM IST

Updated : Aug 1, 2022, 2:03 PM IST

बगदाद (इराक) - आयएसआयएस (ISIS) च्या दहशतवाद्यांच्या क्रूरता सबंध जगाला ( ISIS made mother eat her child ) माहिती आहे. या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने सीरिया आणि इराकमध्ये भरपूर विध्वंस घडवून आणला आहे. हे दहशतवादी बंदुकीच्या जोरावर यझिदी महिलांना सेक्स स्लेव बनवून त्यांचे शारीरिक शोषण करतात. त्याचेच एक उदाहरण इराक देशातील खासदार विआन दाखिल यांनी दिले. त्यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत एका महिलेचा उल्लेख केला. आयएसआयएसने या महिलेला तिच्याच एक वर्षाच्या मुलाचे मास खायला दिले. मात्र, ते मांस कुणाचे हे माहिती नसल्याने तिने ते खाल्ले, असा खुलासा महिलेने केल्याचे विआन यांनी सांगितले.

हेही वाचा - देशाच्या सुरक्षेवरून तामिळनाडूच्या राज्यपालांची मनमोहन सिंह यांच्यावर टीका; 26/11 दहशतवादी हल्ल्याचे दिले उदाहरण

या भयंकर दहशतवादी संघटनेच्या क्रूरतेतून सुटलेल्या अनेक यझिदी महिलांनी ISIS च्या क्रूरतेची कहाणी सांगितली आहे. एका यझिदी महिलेला इराकी खासदार विआन दाखिल यांनी ISIS च्या ताब्यातून वाचवले होते. यानंतर त्या महिलेने जे सांगितले ते ऐकून सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला. महिलेने तिच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंगाचा सामना केला होता.

इराकचे खासदार वियान दाखिल यांनी इजिप्शियन टीव्ही चॅनल एक्सट्रा न्यूजला सांगितले की, महिलेला तीन दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तळघरात कैद करण्यात आले. त्या महिलेला वाचवल्यावर तिने आपली कहाणी सांगितली. ISIS च्या दहशतवाद्यांनी आपल्याला सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवल्याचे महिलेने सांगितले. तिच्यासोबत एक वर्षाचा मुलगा होता. त्याला दहशतवाद्यांनी जबरदस्तीने वेगळे केले होते. तीन दिवसांनंतर एका दहशतवाद्याने तिच्या मुलाची हत्या केली, त्याचे मांस शिजवले आणि महिलेला भातासोबत खायला दिले. त्या गरीब महिलेने ते अन्नही नकळत खाल्ले. नंतर तिला कळले की ते मांस तिच्या मुलाचे होते.

हेही वाचा - Leopard made cow its prey: ट्रकच्या हॉर्न-लाईटला न घाबरता बिबट्याने केली गायीची शिकार

Last Updated : Aug 1, 2022, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.