हैदराबाद - महाराष्ट्रातील किनवट तालुक्यातील सिंगरीवाडा येथील मडावी रत्नमाला ही गर्भवती महिला इंद्रावेली येथे राहते. हे गाव तेलंगाणातील आदिलाबाद जिल्ह्यात आहे. रविवारी ती आपल्या कुटुंबीयांसह आदिलाबादला इंद्रावेलीहून निघाली होती. रत्नमाला हिला प्रसूती वेदना होत असल्याचे समजताच चालकाने बस गुडीहटनूर झोनमधील मानकापूर येथे थांबवली. १०८ रुग्णवाहिकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने तिने आरटीसी बसमध्ये एका मुलाला जन्म दिला. चालकाने बस थेट गुडीहटनूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवली.
तिची तपासणी केल्यानंतर आई आणि बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरटीसी डीव्हीएम मधुसूदन आणि डीएम विजय यांनी रुग्णालयात धाव घेऊन आई आणि बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. 'आरटीसी बसमध्ये जन्मलेल्या मुलाला आयुष्यभर आरटीसी बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी मोफत बस पास दिला जाईल.' आरटीसीचे एमडी सज्जनार म्हणाले.
आरटीसीचे अध्यक्ष बाजीरेड्डी गोवरथनरेड्डी आणि सीएमडी सज्जनार यांनी आईला सुरक्षितपणे रुग्णालयात नेल्याबद्दल बस चालक एम अंजना आणि कंडक्टर सीएच गब्बर सिंग यांचे अभिनंदन केले.