कोल्लेगल(कर्नाटक) : कर्नाटकातील म्हैसूर येथील कोल्लेगल मुख्य मार्गावरील कुरुबुरू गावाजवळ खासगी बस आणि इनोव्हा कारची धडक होऊन अपघात झाला. यात 10 जण ठार तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील प्रवासी हे बेल्लारी येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी दिली असून, माले मादेश्वरला भेट दिल्यानंतर ते म्हैसूर शहराकडे जात असताना हा अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण माहिती मिळेल. पोलीस मृतांची नावे पडताळत असून डॉक्टर व कुटुंबीयांकडून माहिती घेतल्यानंतर याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
मृतांची नावे - सर्व मृत बेल्लारी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तीन कुटुंबांतील 10 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात संदीप (23), त्याचे वडील कोत्रेश (45) आणि आई सुजाता (35) हे एकाच कुटुंबातील आहेत. याशिवाय मंजुनाथ (40), पत्नी पूर्णिमा (30), मुलगा कार्तिक (11), पवन (7) हे एकाच कुटुंबातील आहेत. मृत आई गायत्री (30) आणि मुलगी श्रव्या (3) या दुसऱया कुटुंबातील आहेत.
मदतीची मागणी - याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व कुटुंबीयांना शासनाने तातडीने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे राज्य ऊस उत्पादक संघाचे प्रदेशाध्यक्ष कुरुबुरु शांताकुमार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सीएम सिद्धरामय्या यांनी ट्विट केले : म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसीपुराजवळ झालेल्या दुर्दैवी अपघाताने मी व्यथित झालो आहे, ज्यामध्ये 10 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे ट्विट सिद्धरामय्या यांनी केले आहे.
सोमवार ठरला घातवार - सोमवारी महाराष्ट्रातही वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी समृद्धी महामार्गावर कार रिलिंगला धडकली. यात तिघांचा मृत्यू झाला. तसेच सोमवारी दुपारी ठाण्याजवळील माळशेज घाटाजवळ ट्रक व एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यात 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -