ETV Bharat / bharat

बलात्काराचा बदला बलात्काराने? 2 भावांनी सामूहिक अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप, वाचा... - physical abuse allegations Garh Thana

जिल्ह्यातील गढ ठाणा क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीने तिच्यावर दोन भावांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. दोघांनीही घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

physical abuse case Garh Thana area Rewa
पोलीस ठाणे गढ
author img

By

Published : Sep 22, 2021, 6:16 PM IST

Updated : Sep 22, 2021, 9:21 PM IST

रीवा (म.प) - जिल्ह्यातील गढ ठाणा क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीने तिच्यावर दोन भावांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. दोघांनीही घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - VIDEO धक्कादायक! दिल्लीतील रेस्टॉरंटने साडी घातल्याने महिलेला नाकारला प्रवेश

7 महिन्यांपूर्वी गावातीलच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्याचा सूड घेण्यासाठी पीडितेच्या भावांनी अत्याचार केला, असा तक्रारकरत्या मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे.

बलात्कारच्या बदल्यात बलात्कार?

मुलीनुसार, 18 सप्टेंबरला ती घरी एकटी होती, त्यावेळी दोन्ही भाऊ तिच्या घरी आले. त्यांनी तिला पकडले आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. हे कृत्य केल्यानंतर दोन्ही भाऊ धमकी देऊन तेथून पसार झाले. घटनेवेळी तिची आई प्लाटवर काम करायला गेली होती, ती रात्री आल्यावर मुलीने तिला सर्व घटना सांगितली. त्यानंतर मुलीचे नातेवाईक तिला घेऊन पोलीस ठाण्यात आले आणि तक्रार दाखल केली, ज्यावर पोलिसांनी दोन्ही युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दोन्ही भावांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप तक्रारकर्त्या अल्पवयीन मुलीने केला आहे. तसेच, आरोपींनी बदला घेतला, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून होत आहे.

बलात्कार पीडितेच्या भावांवर केला सामूहिक दुष्कर्माचा आरोप

हे प्रकरण नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेवेळी दोन्ही युवकांचे लोकेशन कुठे होते, मुलीच्या घराकडे येताना त्यांना कोणी पाहिले का? मुलीसोबत प्रत्यक्षात बलात्कार झाला आहे का? की जुण्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे, या सर्व बाबींविषयी पोलीस तपास करत आहे.

अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली होती, ज्यावरून प्रकरणाची नोंद घेण्यात आली. संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासात जे तथ्य समोर येतील त्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिव कुमार वर्मा यांनी दिली.

हेही वाचा - बर्गरसोबत खाल्ला विंचू; तरुणाची तब्येत बिघडली... पाहा VIDEO

Last Updated : Sep 22, 2021, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.