ETV Bharat / bharat

Minor Girl Rape : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पोलिसांची माहिती देण्यास टाळाटळ - बिहारमधील छपरा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बिहारमधील छपरा येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये हे कृत्य करणारे चार मुल आहेत अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत मुलीला जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर झाली आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

File Photo
फाईल फोटो
author img

By

Published : Jan 16, 2023, 9:17 PM IST

सारण : बिहारमधील छपरा येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. मुलीला जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. ही घटना नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती आहे. पीडितेचे वडील तिथे नाहीत. घटनेबाबत पीडितेने सांगितले की, रविवारी ती काही कामानिमित्त घरून निघाली होती. तिच्यासोबत एक मित्रही होता, त्यानंतर चार मुलांनी तिला बळजबरीने उचलून निर्जनस्थळी नेले आणि या सर्वांनीच बलात्काराची घटना घडवून आणली.

घटनास्थळावरून आरोपी फरार : घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पीडितेने कसेबसे तिच्या घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर रात्रीचं मुलीला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी तीची प्रथमिक तपासनी केल्यानंतर तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी पीडितेचे जबाब नोंदवले आहेत. पीडितेने दोन्ही आरोपींना ओळखले आहे. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या पीडितेला महिला पोलिसांच्या ताब्यात छपरा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोणताही अधिकारी काहीही सांगण्यास टाळाटाळ करत आहे असी माहितीही समोर आली आहे.

अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी : मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. तीच्या वडिलांचे आधीच निधन झालेले आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्य मोलमजुरी करून घर चालवतात. रविवारी संध्याकाळी उशिरा ती मैत्रिणीसोबत घराबाहेर पडली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिच्या गावातील असून, दोन आरोपींची ओळख पटली आहे. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र, पोलीस अधिकारी याबाबत काहीही बोलण्याचे टाळत आहेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

घटनेमुळे लोकांमध्ये संताप : छपरा येथील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराबाबत लोकांमध्ये संताप वाढला आहे. लहान मुलीने कोणाची काय चूक केली, तिच्यासोबत असे लज्जास्पद कृत्य केले, असा लोकांचा संताप आहे. मुलीचे वय 12 वर्षे आहे. जी रविवारी सायंकाळी मैत्रिणीसोबत महमूद चौकाकडे निघाली होती. तेथून परतत असताना चार तरुणांनी तीचे अपहरण करून अनोळखी ठिकाणी तीला घेऊन गेले. त्यानंतर तीच्यावर या चौघांनी सार्वजनी अत्याचार केला. दरम्यान, यातील सर्व आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.