ETV Bharat / bharat

Fire In Mahakali Nagar : महाकाली नगरमध्ये भीषण आग; अनेक कुटुंब उघड्यावर

नागपूरच्या महाकाली नगरमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ( fire Broke out in Mahakali Nagar, Nagpur ) यावेळी सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.

Fire In Mahakali Nagar
Fire In Mahakali Nagar
author img

By

Published : May 9, 2022, 11:34 AM IST

Updated : May 9, 2022, 12:09 PM IST

नागपूर - नागपूरच्या महाकाली नगरमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ( fire Broke out in Mahakali Nagar, Nagpur ) दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावेळी सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.

नागपूर शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. एका-मागे एक असे अनेक सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे. सुरुवातीला एका झोपडीत आग लागल्यानंतर शेजारच्या अनेक झोपड्या देखील जळाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांना आग विझविण्यात यश मिळाले आहे.

आग सकाळी 9 वाजताच्या सुमारास लागली, सुरुवातीला नागरिकांनीचं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले,मात्र एकाला-एक झोपड्या लागून असल्याने बघता बघता आगी पसरत गेली,ज्यांमुळे अनेक घरातील समान जळून राख झाले आहे. आग नेमकी कश्यामुळे आणि कुठे लागली या संदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही,मात्र आगीच्या घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

हेही वाचा - Rana Couple Fly to Delhi : राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना; आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही - नवनीत राणा

Last Updated : May 9, 2022, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.