ETV Bharat / bharat

Karnataka Elections 2023: ९२ वर्षीय शमनूर शिवशंकरप्पा काँग्रेसचे उमेदवार म्हणून उतरले रिंगणात; कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार - कर्नाटक निवडणुक

कर्नाटकातील ९२ वर्षीय सर्वात ज्येष्ठ उमेदवार शमनूर शिवशंकरप्पा हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. ते पाच वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.

Karnataka Elections 2023
काँग्रेसचे उमेदवार शमनूर शिवशंकरप्पा
author img

By

Published : Apr 19, 2023, 8:21 AM IST

बेंगळुरू : कर्नाटकातील दावणगेरे दक्षिण मतदारसंघाचे 92 वर्षीय उमेदवार शमनूर शिवशंकरप्पा हे देशातील सर्वात वयस्कर विद्यमान आमदार आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे बीजी अजय कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यावेळी भाजपने लिंगायत समाजाचा उमेदवार उभा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकरप्पा यांनी दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत.

भाजपच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवणार : दावणगिरीचे आमदार म्हणून ते पाच वेळा निवडून आले आहेत. ते वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध चौथ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. शिवशंकरप्पा यांनी 1994 मध्ये राजकारणात पदार्पण केले आणि प्रथमच दावणगेरे नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले. पुढे 1994 मध्ये त्यांनी दावणगेरे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेत प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2008 मध्ये मतदारसंघाचे विभाजन झाले. ते 1994, 2004, 2008, 2013 आणि 2018 मध्ये दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.

राज्यात इतिहास घडवणार : 1997 मध्ये ते लोकसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले. त्यानंतर 1999 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवशंकरप्पा म्हणाले, मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मी ९२ वर्षांचा असूनही मी निवडणूक लढवत आहे. जनतेच्या पाठिंब्याने मी पुन्हा विजयी होणार आहे. दक्षिण मतदारसंघातून सातत्याने जिंकत आलो आहे. यावेळीही मी जिंकून इतिहास घडवणार आहे. शमनूर शिवशंकरप्पा यांचे पुत्र आणि माजी मंत्री एसएस मल्लिकार्जुन म्हणाले, आमचे वडील या वयातही प्रचार करत आहेत. यावेळीही ते विजयी होऊन संपूर्ण राज्यात इतिहास घडवतील, असा अंदाज आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे.

हेही वाचा : BJP List Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जारी केली उमेदवारांची पहिली यादी, 52 नव्या चेहऱ्यांना संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.