नवी दिल्ली - आजचा दिवस कसा असेल, कालच्या महत्त्वाच्या काय घडामोडी होत्या? कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी आज नजरेत असणार आहेत. जाणून घ्या, थोडक्यात.
23 डिसेंबर रोजीच्या (काल) महत्त्वाच्या घडामोडी
- मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेले ५ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. त्यापैकी १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सविस्तर वाचा-
- राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ( Aditya Thackarey Threat Case ) आलेल्या धमकीचे पडसाद आज विधान भवनात उमटले. शिवसेना आमदार सुनील प्रभू ( Sunil Prabhu On Aditya Thackarey Threat Case ) यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित करून आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत सरकारने योग्य दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली. सविस्तर वाचा-
- विधानसभेत शक्ती कायदा ( Shakti Bill passed ) एकमताने मंजूर झाला आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात शक्ती कायदा मांडण्यात आला होता. कायदा मंजूर झाल्यावर महिला व बालकल्याण मंत्री यशमोती ठाकूर आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिल्या. शक्ती कायदा एकमताने मंजूर झाल्याचे त्यांनी स्वागत केले आहे. सविस्तर वाचा-
- पंजाबमधील लुधियाना शहरातील न्यायालयीन ( Explosion in District Court of Ludhiana) इमारतीमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे भिंत कोसळली असून यात 1 जणाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटामुळे न्यायालयाची संपूर्ण इमारत हादरली असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. पोलीस पथक आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा-
- सोलापूर अक्कलकोट महामार्गावर असलेल्या सादुल पेट्रोल पंपासमोर ड्रेनेजमध्ये काम करत असताना चार मजुरांचा मृत्यू ( Four deaths during drainage work ) झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. चारही मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत. तर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा-
या महत्त्वाच्या घडामोडींवर असणार नजर
- कपिल देवच्या नेतृत्वाखाली ( Kapil Dev Led Cricket Team ) 1983 मध्ये पहिल्यादाच भारतीय क्रिकेट संघाने ( Indian Cricket Team ) विश्वचषक जिंकला होता. त्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 हा चित्रपट ( 83 Movie ) प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री ( 83 Tax Free in Delhi ) करण्याचा निर्णय दिल्ली राज्य सरकारने ( Delhi State Government Decides ) घेतला आहे. हा सिनेमा 24 डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
- रक्त चंदनच्या तस्करी प्रकरणात अटक आरोपी बादशाह मलिकला पीएमएलए न्यायालयाने 24 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडीमध्ये पाठविण्याचा आदेश दिला. बादशाह मलिक याला कुर्ला येथून आज सकाळी ईडीने अटक केली होती. अटक केल्यानंतर रिमांडसाठी त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावली होती.
- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) नेट परीक्षांचे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांचे वेळापत्रक (UGC NET Exam Timetable) जाहीर केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेजाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सत्रांसाठी आयोजित केली जात आहे. ही परीक्षा २४ डिसेंबरपासून सुरू होईल. तर २७ डिसेंबरला परीक्षा संपणार आहे.
- सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष यांच्या 'अतरंगी रे' हा सिनेमा २४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. गुरुवारी या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय याने केले आहे. याआधी आनंद याने रांझणा, तनु वेड्स मनु यांसारखे सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमातील गाणी इरशाद कामिल यांनी लिहिली असून ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे.
जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस