नवी दिल्ली/नोएडा - नोएडातून डीजिटल रेपचा ( Digital rape case Noida ) प्रकार समोर आला आहे. नोएडाच्या सेक्टर - 39 मध्य राहणारा वृद्ध चित्रकार ( Digital rape news Noida ) हा आपल्या मोलकरणीवर गेल्या सात वर्षांपासून डिजिटल बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चित्रकाराला अटक केली आहे. या घटनेनंतर डिजिटल रेप काय आहे? हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
हेही वाचा - Todays Gold and Silver Rates : जाणून घ्या, राज्यातील आजचे सोने आणि चांदीचे दर..
अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, मूळचा अलाहाबादचा (प्रयागराज), चित्रकार मॉरिस रायडर (वय 80) हा सेक्टर 46 मध्ये एका महिला मैत्रिणीसोबत राहतो. या महिला मैत्रिणीच्या संरक्षणात एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी देखील राहाते. ही मुलगी घरात मोलकरीन म्हणून काम करते. गेल्या अनेक वर्षांपासून मॉरिस राइडर आपल्यावर लैगिक शोषण करत असल्याचा पीडितेचा आरोप आहे.
पीडितेने सांगितले की, ती दहा वर्षांची होती तेव्हापासून येथे राहात आहे. अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, पीडितेने पोलिसांना आरोपीचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देखील दिले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३२३, ५०६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.
काय आहे डिजिटल रेप? - नोएडामधील डिजिटल बलात्कार प्रकरणात अटक झाल्याची बातमी आल्यानंतर नोएडातील लोक, पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. डिजिटल बलात्काराचा मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी काहीही संबंध नाही. इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही मुलीचे किंवा मुलाचे शोषण, असे डिजिटल रेपचा अर्थ नाही. जिथे इंग्रजीमध्ये डिजिटचा अर्थ अंक, तर इंग्रजी शब्दकोशानुसार, बोट, अंगठा, पायाची बोटे या शरीराच्या भागांना देखील डिजिट असे संबोधले जाते. म्हणजेच, ही बलात्काराची अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये नाजूक भागांवर बोट, अंगठा किंवा पायाचे बोट वापरले गेले.
..या माध्यमातून मुलांना डिजिटल रेपची माहिती मिळत आहे - मीडियाच्या माध्यमातूनही डिजिटल बलात्काराबाबत जनजागृती केली जात आहे. 2016 मध्ये शाळेतून घरी परतत असताना स्कूल बसच्या कंडक्टरने बसमध्ये केजीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य झाल्याचे समजल्यानंतर मुलीचे पालक संतप्त झाले आणि त्यांनी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी मुलांच्या सुरक्षेसाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही चालवण्यात आले होते. आरोपी कंडक्टरला वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव करून देण्यासाठी प्ले स्कूल आणि प्राथमिक शाळांमध्येही अनेक प्रकारच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. डिजिटल रेपचीही माहिती दिली जात आहे.
हेही वाचा - Todays Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेल आज किती महाग? जाणून घ्या..