नवी दिल्ली- देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. शुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. हा निकाल लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे.
लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत प्रथम आलेल्या शुभम कुमार यांनी आयआयटी मुंबई येथून बी. टेक (Civil Engineering) केले आहे. महिलांमध्ये जागृती अवस्थी या प्रथम आल्या आहेत. त्यांचा सर्व श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक आहे. त्यांनी भोपाळमधून बी. टेकचे (Electrical Engineering) शिक्षण पूर्ण केले आहे. अंकिता जैन यांचा तिसरा क्रमांक आला आहे.
युपीएससीच्या पहिल्या 25 गुणवंतांमध्ये 13 पुरुष आणि 12 महिला आहेत. युपीएससी परीक्षेत एकूण उत्तीर्ण उमेदवारांपैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत.
हेही वाचा-आसाम: पोलिसांसमोर मृतदेहाला तुडविणाऱ्या निर्दयी फोटोग्राफरला अटक
तीन टप्प्यांत घेण्यात येते युपीएससी परीक्षा
नागरी सेवा परीक्षा या लोकसेवा आयोगाकडून पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS),भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर महत्त्वाच्या प्रशासकीय सेवांमधील पदाकरिता निवड होते.
हेही वाचा-पेट्रोलसह डिझेल जीएसटीच्या कक्षेत कधी येणार? निर्मला सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर
हेही वाचा-अबब! चुकीचा हेअरकट केल्याने करावी लागली 2 कोटींची भरपाई