ETV Bharat / bharat

Omicron In Rajasthan : राजस्थानमध्ये 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काही दिवसांपूर्वी झाली होती ‘ओमायक्रॉन’ची बाधा - ओमायक्रॉन अपडेट

ओमायाक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून ( Omicron In Rajasthan ) येत आहेत. यातच उदयपूरमध्ये उपचारादरम्यान एका 73 वर्षीय व्यक्तीचा ( Rajasthan’s First Death Due to Omicron Variant ) मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा ओमायाक्रॉनची बाधा झाली होती.

Omicron
ओमायक्रॉन
author img

By

Published : Dec 31, 2021, 1:28 PM IST

Updated : Dec 31, 2021, 1:44 PM IST

उदयपूर - सध्या कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांची डोकेदुःखी वाढवली असताना ओमायाक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून ( Omicron In Rajasthan ) येत आहेत. यातच उदयपूरमध्ये उपचारादरम्यान एका 73 वर्षीय व्यक्तीचा ( Rajasthan’s First Death Due to Omicron Variant ) मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा ओमायाक्रॉनची बाधा झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

रुग्णाची उपचारादरम्यान कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या निगेटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर रुग्णांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली. ती चाचणी गेल्या 25 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आली होती. आरोग्य विभागानुसार, रुग्णाला न्यूमोनिया, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या होती. दरम्यान, उदयपूरमधून आतापर्यंत 3 लोक ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.

52 वर्षीय ओमायक्रॉनबाधित रूग्णाचा मृत्यू -

नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या एका 52 वर्षीय ओमायक्रॉनबाधित रूग्णाचा हृदयिवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत माहित दिली गेली आहे. 12 डिसेंबर रोजी ही व्यक्ती नायजेरियामधून पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली होती. यानंतर हृदयाच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहिला धक्का सौम्य होता, मात्र दुसऱ्या धक्क्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात ( Coronavirus In Maharashtra ) आहेत. इतर राज्यातदेखील ओमायक्रॉनची रुग्ण दिसून येत आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

हेही वाचा - Samana Editorial : भाजप काळात मोगलाई वाढली! 'त्या' मुलांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने सामनातून प्रहार

Last Updated : Dec 31, 2021, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.