ETV Bharat / bharat

विश्वचषकात भारताचा पराभव झाल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या ७ काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक

Kashmiri Students UAPA : विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या ७ विद्यार्थ्यांना UAPA अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांवर फायनल मॅचनंतर पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचाही आरोप आहे.

Kashmiri students booked
Kashmiri students booked
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 7:50 PM IST

श्रीनगर Kashmiri Students UAPA : जम्मू आणि काश्मीरमधील ७ विद्यार्थ्यांना UAPA अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर १९ नोव्हेंबरला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर आनंद साजरा केल्याचा आरोप आहे.

या कलमाअंतर्गत अटक : शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या या विद्यार्थ्यांवर युएपीएच्या कलम १३ आणि आयपीसीच्या कलम ५०५ आणि ५०६ अंतर्गत आरोप ठेवण्यात आलाय. पंजाबमधील एका विद्यार्थ्यानं त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या विद्यार्थ्यांना जम्मू-काश्मीरच्या गंदरबालमधून अटक करण्यात आली आहे. उमर, आसिफ, मोहसीन, तौकीर, खालिद, समीर आणि उबेद अशी त्यांची नावं आहेत.

पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या : विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन बैस यानं तक्रार दाखल केली होती की, या सात विद्यार्थ्यांनी त्याला भारताचं समर्थन केल्यामुळे धमकावलं होतं. त्यांनी मला शांत राहण्याची धमकी दिली, अन्यथा मला गोळ्या घातल्या जातील, असं सचिननं तक्रारीत नमूद केलंय. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून या विद्यार्थ्यांना अटक केली. तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे की, फायनल मॅचनंतर आरोपी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या होत्या. यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या आधीही अशा घटना झाल्या : २०२१ मध्ये, टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताचा पराभव केल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरही युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी, २०१६ मध्ये श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये वेस्ट इंडिजकडून भारताच्या पराभवानंतर वाद निर्माण झाला होता. तेव्हा गैर काश्मिरी विद्यार्थ्यांनी स्थानिक काश्मिरी विद्यार्थ्यांवर भारताच्या पराभवानंतर जयजयकार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हिंसक बाचाबाची झाली. हाणामारी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी कॅम्पसमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला होता.

हेही वाचा :

  1. JKLF Ex Terrorists Arrested : जेकेएलएफ आणि हुर्रियतला पुन्हा सक्रिय करण्याचा कट; दहा माजी दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
  2. लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर चकमकीत ठार, अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.