आग्रा : जिल्ह्यात एका कॅन्टीनचे जीर्ण छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 7 जण ढिगाऱ्याखाली दबले Roof Of Dilapidated Canteen Collapses. त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या कॅन्टीनमध्ये मद्यपी दारु पित बसले होते. त्याचवेळी ही घटना घडली.
मद्यधुंद ताजनगरी आग्रा येथे शनिवारी रात्री कॅन्टीनच्या छताखाली दबून मोठा अपघात झाला. ठाणे सिकंदराच्या सेक्टर 12 च्या पाण्याच्या टाकीजवळ विदेशी दारूचे दुकान आहे. त्याच्या शेजारच्या कॅन्टीनमध्ये बरेचदा लोक दारू पिण्यासाठी बसतात. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास कॅन्टीनचे छत कोसळले. आवाज ऐकून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रस्त्याने जाणाऱ्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने लोकांच्या मदतीने ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी कॅन्टीनमध्ये बरेच लोक उपस्थित होते. तर एएसपी हरिपर्वत सत्यनारायण यांच्या म्हणण्यानुसार, मातीचा ढिगारा हटवल्यानंतर 7 जणांना बाहेर काढण्यात आले 7 people buried under rubble. त्यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जीर्ण इमारतीत सुरू होते कँटीन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीर्ण इमारतीत कँटीन सुरू होते. सततच्या पावसामुळे ते केव्हाही कोसळेल अशी शक्यता होती. धोका लक्षात आल्यानंतरही कॅन्टीन चालकाने लोभापायी कॅन्टीन सुरूच ठेवले आणि लोकांचा जीव धोक्यात घातला, यात 7 जण जखमी झाले. सध्या कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही, मात्र ढिगाऱ्याखाली दबलेल्या 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत जखमी झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.