'व्हॅलेंटाईन डे' आला म्हणून सगळ्या कपल्सचे प्रेम हवेत आहे. या दिवशी, जोडपे रोमँटिक भेटवस्तू आणि ग्रिटींग कार्ड देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. सलमान खान एकदा म्हणाला होता, 'व्हॅलेंटाईन डे से मेरा क्या लेना देना,' पण तुम्ही जर का सिंगल असाल तर, निराश होऊ नका. हा दिवस केवळ नातेसंबंध साजरा करण्यासाठी नाही तर, प्रेम साजरे करण्यासाठी देखील आहे आणि अविवाहितांसाठी म्हणजेच सिंगल लोकांसाठी ते सेल्फ-लव्ह असू शकते. हा दिवस साजरा करण्यासाठी आणि सर्व सिंगलसाठी काही गोष्टींची यादी येथे आहे.
सोलो ट्रिप : थोडेसे सेल्फ-लव्ह खूप आत्मविश्वास देऊन जाते आणि या व्हॅलेंटाईन डे ला स्वत:ला पुन्हा शोधण्यासाठी एकट्याने केलेली सोलो ट्रिप ही भन्नाट कल्पना आहे. जे तुम्हाला सर्वात जास्त आनंद देते ते आजच्या दिवशी करा. सोलो बाइक राईडने एखाद्या सुंदर स्थळी जाणे, दीर्घकालीन आनंद वाढविण्यात मदत करते.
स्वतःला डेटवर घेऊन जा : मस्त कपडे परिधान करा, एका छान फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जा आणि तुमचे आवडते जेवण घ्या. त्वचेची काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी करा, स्पामध्ये जा आणि स्वतःचे लाड करण्यासाठी काही ग्रूमिंग करा. पॉपकॉर्नचा आस्वाद घेत, आपल्या आवडीचा एखादा चित्रपट बघून दिवस साजरा करा.
हाऊस पार्टी : घरातील पार्टीसाठी तुमचे काही सिंगल मित्र आणि कुटुंब एकत्र जमा. तुमचे तसेच तुमच्या गेस्टच्या आवडीचे पदार्थ तयार करा आणि जेवणाच्या टेबलावर त्यांचा आनंद घ्या. पार्टीमध्ये तुमच्या मित्रांसह खेळण्यासाठी मनोरंजक गेमची योजना करा किंवा तुमचा सगळ्यांचा आवडता डांस करुन, दिवस साजरा करा.
सहल : मित्रांसह एखादी सहल आयोजित करा. एखाद्या सुंदर रमणीय ठिकाणी जा. जेथे तलाव किंवा एखादी नदी असेल, अशी जागा निवडा. असे ठिकाण आणि तिथले निसर्गरम्य वातावरण तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देऊन जाईल. पिकनिक लंच पॅक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत आजच्या दिवसाचा आनंद घ्या.
चित्रपट/मालिका पहा : ओटीटी प्लॅटफॉर्मला तुमच्या मूडनुसार सर्वकाही मिळाले आहे. तुम्ही बर्याच दिवसांपासून पाहण्याची योजना आखत असाल, तर तो वेब शो पाहणे सुरू करा किंवा चित्रपट बघण्यास तुम्ही बाहेर पडा.