ETV Bharat / bharat

कोरोना बळावतोय; भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : Feb 21, 2021, 10:28 PM IST

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जगात कोरोना रुग्ण सक्रिय असलेल्या पहिल्या 15 देशांच्या यादीत भारताचाही क्रमांक आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 13 हजार 919 रुग्ण आढळले आहेत. तर 11 हजार 667 जण कोरोना मुक्त झाले असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

रायूपर - कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला होता. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. जगात कोरोना रुग्ण सक्रिय असलेल्या पहिल्या 15 देशांच्या यादीत भारताचाही क्रमांक आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 13 हजार 919 रुग्ण आढळले आहेत. तर 11 हजार 667 जण कोरोना मुक्त झाले असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णांची संख्या वाढणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाब, पुद्दुचेरी, त्रिपुरा आणि चंदीगढचा समावेश आहे. गेल्या 24 तासांमध्ये 85.61 टक्के रुग्ण पाच राज्यांमध्ये आढळले आहेत. तर 80 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळात सर्वांत जास्त रुग्ण संख्या आढळली आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 89 हजार 715 कोरोना मुक्त झाले आहेत.

छत्तीसगढमध्ये 3 हजार 102 रुग्ण सक्रिय -

छत्तीसगढमध्ये 3 हजार 102 रुग्ण सक्रिय आहेत. छत्तीसगढ आरोग्य विभागानुसार राज्यात रविवारपर्यंत 263 रुग्ण आढळले आहेत. तर 143 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 3 लाख 3 हजार 835 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बीजापुर आणि सुकमा जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. राज्यात 3 हजार 795 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेशात 1 हजार 994 सक्रिय रुग्ण -

शनिवारी मध्य प्रदेशात 257 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 2 लाख 59 हजार 128 झाली आहे. शनिवारी, कोरोना संक्रमित 4 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे, रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढून 3 हजार 850 झाली आहे. त्याच वेळी 213 संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 53 हजार 284 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 994 रुग्ण सक्रिय आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. इंदूर येथील 100 रूग्णांचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात 48 हजार 439 सक्रिय -

शनिवारी महाराष्ट्रात 6 हजार 281 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासांत, 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 20 लाख 93 हजार 913 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 19 लाख 92 हजार 530 लोक पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे 51 हजार 753 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 48 हजार 439 कोरोना पीडितांवर उपचार अद्याप सुरू आहेत. पुन्हा एकदा कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील पुणे येथे नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

पंजाबमध्ये 358 रुग्णांची नोंद -

पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 358 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सकारात्मक रूग्णांची संख्या 1लाख 78 हजारांवर गेली आहे. 20 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 5 हजार 748 वर गेला आहे.

केरळमध्ये 58 हजार 610 सक्रिय रुग्ण -

केरळ राज्यात गेल्या 24 तासांत 4 हजार 650 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 5 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 10 लाख 30 हजार 588 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्ग झालेल्यांमध्ये 9 लाख 67 हजार 630 रूग्ण पूर्णपणे स्वस्थ झाले आहेत. आतापर्यंत 4 हजार 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात अद्याप 58 हजार 610 सक्रिय रुग्ण आहेत.

गुजरातमध्ये 1 हजार 672 सक्रिय रुग्ण -

गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या नव्या 258 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 270 कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 2 लाख 66 हजार 821 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये 2 लाख 60 हजार 745 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 हजार 404 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राजस्थानमधील 1 हजार 300 सक्रिय रुग्ण -

राजस्थानमध्ये गेल्या 24 तासात 98 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 66 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 3 लाख 19 हजार 461 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 15 हजार 376 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राजस्थानात आतापर्यंत 2 हजार 785 कोरोना संक्रमित मृत्यूमुखी पडले आहेत. तर राज्यात अद्याप 1 हजार 300 संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत.

आकडेवारीवर एक नजर -

देशात आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 89 हजार 715 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 11 हजार 667 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 85.61% टक्के नव्या रुग्णांची नोंद पाच राज्यात झाली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गेल्या चोवीस तासांत एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. त्यात गुजरात, ओडिशा, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, झारखंड, पुद्दुचेरी, आसाम, मेघालय, लक्षद्वीप, मणिपूर, मिझोरम, सिक्किम, लडाख, नागालँड, अंदमान आणि निकोबार बेटे, त्रिपुरा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.