मणिपूर - आसाम रायफल्स युनिटच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी (manipur terror attack) आज (शनिवारी) सकाळी मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील सिंघट उपविभागात हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय लष्करातील कर्नल विपलव त्रिपाठी, त्यांची पत्नी व ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, अन्य चार जवान देखील शहीद झाले आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी ट्विटद्वारे सांगितले. क्विक रिअॅक्शन टीमसह अधिकाऱ्याचे कुटुंबीयही या ताफ्यात होते.
-
#UPDATE | 5 personnel of Assam Rifles and two of their family members lost their lives in an attack in Churachandpur, Manipur: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/zfWDUeUk3b
— ANI (@ANI) November 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | 5 personnel of Assam Rifles and two of their family members lost their lives in an attack in Churachandpur, Manipur: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/zfWDUeUk3b
— ANI (@ANI) November 13, 2021#UPDATE | 5 personnel of Assam Rifles and two of their family members lost their lives in an attack in Churachandpur, Manipur: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/zfWDUeUk3b
— ANI (@ANI) November 13, 2021
त्रिपाठी यांच्या ताफ्याला चुराचंदपूर जिल्ह्यातील सेहकान गावात पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलीपाक (PREPAK) च्या संशयित अतिरेक्यांनी लक्ष्य केले होते. (PREPAK) हा मणिपूरमधील स्वतंत्र मातृभूमीची मागणी करणाऱ्या दहशतवाद्यांचा गट आहे.
आसाम रायफल्सने जारी केले प्रसिध्दीपत्रक
"दहशतवाद्यांशी झालेल्या गोळीबारात ( PREPAK/ PLA कॅडर) कमांडिंग ऑफिसर आणि तीन क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) जवानांना जागीच जीव गमवावा लागला. कमांडिंग ऑफिसरचे कुटुंब (पत्नी आणि 6 वर्षांचा मुलगा) यांचाही मृत्यू झाला आहे. इतर जखमी जवानांना बेहियांगा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले," असे आसाम रायफल्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
संरक्षणमंत्र्यांनी केला निषेध
"चुराचंदपूर, मणिपूर येथे आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला हल्ला क्लेशकारक आहे. देशाने कमांडिंग ऑफिसर आणि दोन कुटुंबीयांसह 5 शूर सैनिक गमावले आहेत. गुन्हेगारांना लवकरच योग्य ती शिक्षा देण्यात येईल' अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.
कर्नल विप्लव यांचे उल्लेखनीय काम
"कर्नल विप्लव यांनी त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांमुळे मिझोरामच्या स्थानिकांशी जवळीक साधली आहे. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या बटालियनने राबविलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेचे विशेष कौतुक झाले होते. त्याद्वारे दुर्गम गावांसह संपूर्ण राज्यात जागरूकता निर्माण झाली. या मोहिमेत तरुणांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले जाते," आसाम रायफल्सच्या निवेदनात म्हटले आहे. शनिवारी केलेल्या या हल्लात बंडखोर गट PREPAK चा हात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण 12/13 नोव्हेंबर हा PREPAK स्मृतीदिन साजरा करण्यात येत असल्याचेही त्यांनी जारी केलेन्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - gadchiroli naxal attack भीषण चकमकीत पाचपेक्षा अधिक नक्षलवादी ठार, आकडा वाढण्याची शक्यता