ETV Bharat / bharat

Bihar Fire News : स्टोव्हच्या एका ठिणगीने कुटुंब उद्ध्वस्त.. घरातील पाच जणांचा आगीत मृत्यू - Aurangabad News

औरंगाबाद जिल्ह्यातील हेतमपूर गावात एका घराला लागलेल्या आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीररीत्या भाजले. स्टोव्हमधून बाहेर पडलेल्या ठिणगीने संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे.

बिहार औरंगाबाद आग बातमी
Bihar Fire News
author img

By

Published : Apr 21, 2023, 10:03 AM IST

Updated : Apr 21, 2023, 11:34 AM IST

औरंगाबाद : घरातील स्टोव्हच्या एका ठिणगीने एक कुटुंब उद्धवस्त झाले आहे. घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ही घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील हेतमपूरमध्ये घडली आहे. आगीच्या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर लगेचच लोकांनी एकत्र येत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवले. सुरुवातीला आगीत लोकही घरात अडकले आहेत हे कोणालाच कळू शकले नाही.

हेतमपूर गावातील विनय भुईया यांच्या घरात दुपारी अन्न शिजवत असताना चुलीतून बाहेर पडलेल्या ठिणगीने घराला आग लागली. आग वेगाने पसरल्यानंतर आजूबाजूची दोन घरेही जळून खाक झाली. यादरम्यान घरातून ओरडण्याचे आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. घरातील सासू, सून आणि नात यांचा जळून मृत्यू झाला आहे. गीता देवी, रीना देवी आणि राणी कुमारी अशी मृतांची नावे आहेत. घराच्या दाराला आग लागल्याने घरातील एकही सदस्य बाहेर पडू शकला नाही. आगीने वेढल्याने सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

परिसरात हळहळ व्यक्त-आगीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अचानक आग इतकी झपाट्याने पसरली की कोणालाच काहीच समजले नाही. लोकांना ताबडतोब कसे बाहेर काढायचे हे घटनास्थळी कोणालाच समजू शकले नाही. मात्र, आगीवर नियंत्रण येईपर्यंत तीन जण गंभीररित्या भाजले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ण कुटुंबच आगीत भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे.

सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू-घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेले एडीएम आशिष कुमार सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची भरपाई दिली जाणार असल्याचे सांगितले. आगीत घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणार आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या घटना टाळण्यासाठी अग्नीप्रतिबंधक साधने बसवावीत व प्रथमोचाराची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

हेही वाचा-पेन्शन घेण्याकरिता वेदनादायी संघर्ष, तुटलेल्या खुर्चीचा आधार घेत वृद्धेची बँकेत पायपीट

Last Updated : Apr 21, 2023, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.