भोपाळ - मध्य प्रदेशमधील हर्षितभाई यांची दीड वर्षांची मुलगी वेदिका ही खूप दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहे. मुलीच्या वडिलांनी अहमदाबादमधील सरकारी रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. राकेश जोशी यांच्याशी संपर्क साधला. डॉ. जोशी यांनी 3 तास अवघड शस्त्रक्रिया करून वेदिकाला गंभीर आजारातून बरे केले आहे.
मध्यप्रदेशात राहणारे हर्षितभाई हे दीड वर्षाच्या मुलीला असलेल्या पोटाच्या ट्युमरमुळे त्रस्त होते. त्यांना सोशल मीडियावर सरकारी रुग्णालयात लहान मुलावरील अवघड शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना ट्विट करत माहिती घेतली. सरकारी रुग्णालयाचे बालविभाग प्रमुख डॉ. राकेश जोशी यांनी मुलीला तपासण्यासाठी घेऊन यावे, असे हर्षितभाई यांना उत्तर दिले.
![ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/gj-ahd-11-civil-hospital-photo-story-7208977_02082021162552_0208f_1627901752_642_0308newsroom_1627976162_693.jpg)
हेही वाचा-#JeendeDo महिलावरील बलात्काराच्या घटनेनंतर 'यांनी' दिली होती वादग्रस्त प्रतिक्रिया
मध्य प्रदेशमधील डॉक्टरांनी मानली हार, अहमदाबादमधील डॉक्टरांमुळे दिसला आशेचा किरण
मध्य प्रदेशमधील निमुच जिल्ह्यात राहणारे हर्षितभाई हे ज्वेलरी उद्योगात काम करतात. त्यांच्या 18 महिन्यांच्या वेदिकाला पोटाचा ट्युमर असल्याचे निदान झाले. विविध तपासण्यांमध्ये मुलीच्या पोटात अविकसित भ्रुण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मध्य प्रदेशमधील डॉक्टर हे अविकसित भ्रुण काढण्यासाठी तयार होत नव्हते. कारण, ते काम हे आव्हानात्मक आणि धोकादायक होते. त्यामुळे वेदिकाचे वडील हताश झाले होते. तेव्हा त्यांना सोशल मीडियातील एका ट्विटमुळे आशेचा किरण दिसला. सरकारी रुग्णालयाच्या बालचिकित्सा विभागात पोटाच्या ट्युमरची शस्त्रक्रिया शक्य असल्याचे एका ट्विट केले होते. पित्याने ट्विटद्वारे सरकारी डॉक्टरांशी संपर्क साधला. मुलगी वेदिकाला घेऊन रुग्णालयात पोहोचले.
![ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/gj-ahd-11-civil-hospital-photo-story-7208977_02082021162552_0208f_1627901752_590-1_0308newsroom_1627976162_95.jpg)
हेही वाचा-पेगासस प्रकरण : नितीश कुमारांच्या मागणीनंतर आतातरी मोदी सरकारने चौकशी करावी - संजय राऊत
3 तास चालली शस्त्रक्रिया-
सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी वेदिकाचे सीटी स्कॅन केले. तेव्हा मुलीच्या पोटात 400 ग्रॅमचा अविकसित भ्रूण असल्याचे आढळले. डॉ. राकेश जोशी यांना अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्ण टीमबरोबर वेदिकाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. पीडियाट्रिक सर्जरी विभागाचे असोसिएशट प्रा. डॉ. जयश्री रामजी आणि अॅनेस्थिया विभागाचे असोसिएशट प्रा. तृप्ती शाह यांच्या मदतीने 3 तास प्रयत्न करून यशस्वीपणे अविकसित भ्रूण काढले.
![मुलगी वेदिका व आई- वडील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/gj-ahd-11-civil-hospital-photo-story-7208977_02082021162552_0208f_1627901752_89_0308newsroom_1627976162_614.jpg)
हेही वाचा-संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
शस्त्रक्रियेदरम्यान अधिक काळजी
शस्त्रक्रियेची माहिती देताना डॉ. राकेश जोशी म्हणाले, की 20 वर्षाच्या वैद्यकीय करियरमध्ये 18 महिन्यांच्या मुलीमध्ये अविकसित भ्रूण आढळण्याची तिसरी केस आहे. जगभरात 5 लाख मुलांमध्ये एका मुलामध्ये असा गंभीर आजार आढळतो. जर शस्त्रक्रियेदरम्यान अधिक काळजी घेतली नाही तर, मुलीच्या मुत्रपिंडासह इतर अवयवांमधून रक्त जाण्याची अधिक शक्यता होती. ही गोष्ट लक्षात घेऊन यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली आहे.
![दीड वर्षांच्या मुलीवर अवघड शस्त्रक्रिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/gj-ahd-11-civil-hospital-photo-story-7208977_02082021162552_0208f_1627901752_887-1_0308newsroom_1627976162_877.jpg)
वडील हर्षितभाई झाले भावूक
मुलीला वेदनामुक्त पाहून तिचे वडील हर्षितभाई अत्यंत भावूक झाले. त्यांनी मध्यप्रदेशमधून गुजरातमध्ये येऊन मोफत शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे व चांगल्या सुविधा देणाऱ्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सरकारी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जे. वी. मोदी म्हणाले, की उपचारासाठी विविध राज्यांमधून लोक सरकारी रुग्णालयात येतात. कोणत्याही रुग्णावर उपचार करण्याचे डॉक्टर टाळत नाहीत.
![वेदिका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/gj-ahd-11-civil-hospital-photo-story-7208977_02082021162552_0208f_1627901752_713_0308newsroom_1627976162_138.jpg)