तेजपूर 32 Myanmar Immigrants Arrested : मणिपूर पोलिसांनी बुधवारी मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर विशेष कारवाईत 32 म्यानमार स्थलांतरितांना अटक केलीय. अटक केलेल्या स्थलांतरितांपैकी 10 जणांना पुढील तपासासाठी हेलिकॉप्टरनं इंफाळला नेण्यात आलंय, तर इतर 22 जणांना मोरे पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे, असं मणिपूर पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
-
On 01.11.2023, during the search operations by security forces at Moreh, Tengnoupal district, 44 persons were detained by the security forces at Moreh, Tengnoupal district out of which 32(thirty-two) persons were found to be Myanmarese/Burmese. Further, 10(ten) Myanmarese…
— Manipur Police (@manipur_police) November 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">On 01.11.2023, during the search operations by security forces at Moreh, Tengnoupal district, 44 persons were detained by the security forces at Moreh, Tengnoupal district out of which 32(thirty-two) persons were found to be Myanmarese/Burmese. Further, 10(ten) Myanmarese…
— Manipur Police (@manipur_police) November 2, 2023On 01.11.2023, during the search operations by security forces at Moreh, Tengnoupal district, 44 persons were detained by the security forces at Moreh, Tengnoupal district out of which 32(thirty-two) persons were found to be Myanmarese/Burmese. Further, 10(ten) Myanmarese…
— Manipur Police (@manipur_police) November 2, 2023
सुरक्षा दलांची मोठी कारवाई : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (मोरेह) उपविभागीय पोलीस अधिकारी सिंगथम आनंद कुमार यांची मंगळवारी गोळी मारून हत्या करण्यात आली होती. कुमार मंगळवारी सकाळी मोरे येथील हेलिपॅडच्या साफसफाईची देखरेख करत असताना स्नायपरनं त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर मणिपूर पोलीस, केंद्रीय सुरक्षा दलाच्या एका पथकानं बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मोरेह मॉर्निंग मार्केट कॉलनी, आसपासच्या परिसरात कारवाई केली.
मणिपूरच्या सीमावर्ती भागात (मोरेह) उपविभागीय पोलिस अधिकारी, चिंगथम आनंद कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करत 32 बेकायदेशीर म्यानमार स्थलांतरितांना अटक केली. 32 पैकी दहा जणांना पुढील चौकशीसाठी हेलिकॉप्टरनं इम्फाळला नेण्यात आलं, तर उर्वरित 22 जणांना मोरे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं. - मणिपूर पोलीस
44 कुकी पोलिसांच्या ताब्यात : या करावाईत विशेष पोलीस कमांडोज, भारत राखीव बटालियन, आसाम रायफल्सच्या पथकांचा समावेश होता. सुरक्षा दलांनी लागोपाठ टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 44 कुकींना अटक केलीय. ताब्यात घेण्यात आलेल्या 44 कुकींपैकी 32 व्यक्ती म्यानमार/बर्मीज असल्याचं आढळून आलंय. त्यांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय मोरेहमध्ये प्रवेश केला होता, असं मणिपूर पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय.
10 जण पुढील चौकशीसाठी इम्फाळला : सुरक्षा दलांनी अटक केलेल्या म्यानमार स्थलांतरितांपैकी 10 जणांना पुढील चौकशीसाठी हेलिकॉप्टरनं इम्फाळला नेण्यात आलं आहे. या स्थलांतरितांना सध्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील साजिवा भागातील विदेशी बंदी केंद्रात ठेवण्यात आलं आहे. म्यानमारच्या स्थलांतरितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिस सूत्रांनी सांगितलंय.
हेही वाचा -