श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये गुरूवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार केले जात असून घटनास्थळी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
श्रीनगरच्या सराफ कदाल भागात गुरूवारी रात्री 9.20 च्या सुमारास दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका नागरिकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - जम्मू काश्मीर : राजौरीतील चकमकीत दहशतवादी ठार, सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला वीरमरण