बफेलो : अमेरिकेत भीषण हिवाळी वादळाच्या तडाख्यात 29 जणांचा मृत्यू झाला (people died due to snowstorm in America) आहे. अनेक ठिकाणी बर्फवृष्टीत लोक अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे अमेरिकामध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. पश्चिम न्यूयॉर्कमधील बफेलो येथे आलेल्या हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्फ साचल्याने हजारो घरे आणि व्यवसायांमध्ये वीजपुरवठा खंडित (29 people died) झाला.
चेतावणींचा सामना : वादळाचे क्षेत्र कॅनडाजवळील ग्रेट लेक्सपासून मेक्सिकोच्या सीमेवर असलेल्या रिओ ग्रांडेपर्यंत पसरले आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने म्हटले आहे की, अमेरिकेतील सुमारे 60 टक्के लोकसंख्येला हिवाळ्यातील हवामान सल्ला किंवा चेतावणींचा सामना करावा लागला. रॉकी पर्वताच्या पूर्वेला अॅपलाचियन्सपर्यंत तापमान सामान्यपेक्षा कमी (frigid monster snowstorm) होते.अमेरिकामधील सध्या मोठे हीमवादळ आहे आले. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सेवांवर मोठा परिणाम : जोरदार बर्फाळ वाऱ्यांमुळे शेकडो उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली आहेत. स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सुमारे 1,707 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. वादळाने बफेलोवर कहर केला. वादळ आणि थंड वाऱ्यामुळे बर्फाची पांढरी चादर पसरली होती. आपत्कालीन सेवांवर मोठा परिणाम (people died due to snowstorm) झाला. आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे विमानतळावरच हजारो नागरिक अडकले आहेत.
बर्फ गोठला : न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले की, शहरातील बहुतांश फायर इंजिन शनिवारी अडकले होते. मंगळवारी सकाळपर्यंत विमानतळ बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय हवामान सेवेने सांगितले की, रविवारी सकाळी बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण 109 सेंटीमीटर बर्फ पडला. तसेच रविवारी सकाळी सात वाजता विमानतळावर 43 इंच बर्फ गोठला होता. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यासही विलंब (frigid monster snowstorm in America) होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीजपुरवठा खंडित : एरी काउंटीचे अधिकारी मार्क पोलोनकार्झ यांनी सांगितले की, रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. आपत्कालीन सेवेचे कर्मचारी त्यांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवू शकले नाहीत. वादळग्रस्त भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात अडचणी येत आहेत. त्याचवेळी रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तीन लाख घरांमध्ये वीजपुरवठा खंडित (snowstorm in America) होता. नागरिकांना ऐन ख्रिसमस सणात अंधारात राहावे लागले आहे.