ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल : सामुदायिक हॉलमधून 200 बॉम्ब जप्त; तीघांना अटक - पश्चिम बंगाल हिंसाचार न्यूज

पश्चिम बंगालमध्ये 44 मतदारासंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. नानूर स्थित सरकारी सामुदायिक हॉलमध्ये तब्बल 200 गावठी बॉम्ब सापडले आहेत. हा हॉल टीएमसीच्या बीरभूम जिल्हा अध्यक्ष अनुब्रत मंडल यांच्या गावात आहे.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल
author img

By

Published : Apr 10, 2021, 1:06 PM IST

नानूर - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज 44 मतदारासंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. यातच अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याची माहिती आहे. नानूर स्थित सरकारी सामुदायिक हॉलमध्ये तब्बल 200 गावठी बॉम्ब सापडले आहेत. हा हॉल टीएमसीच्या बीरभूम जिल्हा अध्यक्ष अनुब्रत मंडल यांच्या गावात आहे.

सामुदायिक हॉलमध्ये सापडलेले 200 बॉम्ब नष्ट केले

नानूर स्थित सरकारी सामुदायिक हॉलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली तेथून जवळपास 200 गावठी बॉम्ब हस्तगत केले आहेत. तसेच घटनास्थळावरून बॉम्ब बनवण्याची सामग्रीही जप्त केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. तर सीआयडीच्या पथकाने हे बॉम्ब गावाच्या बाहेरील एका खुल्या मैदनात निष्क्रिय केले आहेत.

सितलकुचीमध्ये गोळीबारात चार लोकांचा मृत्यू -

कूच बिहारमधील सितलकुची भागात मतदानादरम्यान गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात चार लोकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी असल्याची माहिती आहे. मृतामधील एकाचे नाव आनंद बर्मन असून तो भाजपा समर्थक असल्याच्या त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे आनंद बर्मन आमचा कार्यकर्ता असल्याचा दावा टीएमसीने केला आहे. हुगळीमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार लॉकेट चटर्जी यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप लॉकेट चटर्जी यांनी केला आहे. यातच माध्यमांच्या गाड्यांवरही हल्ला झाल्याची माहिती आहे.

चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदानाला -

पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांतील एकूण 44 जागांसाठी मतदान होत आहे. यापैकी अनुसूचित जातीसाठी 8 आणि अनुसूचित जमातींसाठी 3 जागा राखीव आहेत. 44 जागांवर एकूण 373 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. एकूण 1,15,81,022 मतदार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पात्र आहेत. तर

हेही वाचा - ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवणे हेच आव्हान - बाबुल सुप्रियो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.