नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे 2.38 लाख नवीन रुग्ण नोंदवल्या गेले आहेत. पाॅझिटिव्हीटी रेट 19.65% वरून 14.43% पर्यंत खाली आला आहे. गेल्या 24 तासांत भारतात नोदवण्यात आलेला 2.38 लाख नवीन रुग्णांचा आकडा हा कालच्या तुलनेत 7 टक्क्यांनी कमी आहे.
बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांहून अधिक
आज सकाळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 17.36 लाख आहे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांहून अधिक आहे.
ओमायक्रॉनने बाधित 8 हजार 891 रुग्ण
वेगात पसरणाऱ्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचे एकूण 8हजार 891 रुग्ण आहेत, ज्यामुळे जगभरात साथीच्या रोगाची तिसरी लाट आल्याचे माणले जाते कालपासून त्यात 8.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
3 कोटींपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले
सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1.57 लाख रुग्ण बरे झाले आहेत. आत्ता पर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 3 कोटींपेक्षा अधिक झाला आहे.
लसीकरण वेगात
मंत्रालयाने सांगितले की, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून आजपर्यंत 158.04 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात आज 31 हजार 111 नव्या रुग्णांची नोंद; तर 24 रुग्णांचा मृत्यू