ETV Bharat / bharat

UP Encounters : योगी आदित्यनाथ सरकारच्या कारकिर्दीत सर्वाधिक एनकाउंटर, चकमकीत १७८ जण ठार - योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात गेल्या सहा वर्षांत तब्बल 178 चकमकी झाल्या आहेत. यूपी पोलिसांनी मार्च 2017 पासून तब्बल 178 सूचीबद्ध गुन्हेगारांना गोळीबारात ठार केले. त्यापैकी बहुतेकांवर 75 हजार ते 5 लाख रुपये रोख बक्षिसे ठेवण्यात अली होती.

Yogi Adityanath
Yogi Adityanath
author img

By

Published : Apr 13, 2023, 7:31 PM IST

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात गेल्या सहा वर्षांत तेरा दिवसात एका गुन्हेगाराचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. 20 मार्च 2017 ते 6 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या चकमकींनंतर पोलिसांनी 23 हजरा 69 गुन्हेगारांना अटक केली होती. त्यापैकी 4 हजार 911 जण चकमकीत जखमी झाले होते. एडीजी (कायदा सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की आतापर्यंत गोळीबारात 15 पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी 1 हजार 424 पोलिस गोळीबारात जखमी झाले. यूपी पोलिसांनुसार, 2017 मध्ये 28, 2018 मध्ये 41, 2019 मध्ये 34, 2020 - 2021 मध्ये प्रत्येकी 26, 2022 मध्ये 14 गुन्हेगारांना पोलिसांन यमसदनी पाठवले आहे.

कुख्यात गुंड रोहित सांडू ठार : 28 जून 2019 रोजी, 23 वर्षांपासून फरार असलेल्या दोन वाँटेड गुन्हेगारांना बाराबंकी येथे एका चकमकीत पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या. त्यांनी बँक लुटण्याची योजना आखली होती. जुबेर (48), लोमास (46), दोघेही सीतापूरचे मूळ रहिवासी होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांच्यावर 50 हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या दोघांनीही किमान 110 गुन्हे केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 16 जुलै 2019 रोजी मेरठ आणि मुझफ्फरनगरच्या पोलिस पथकांनी पश्चिम यूपीचा कुख्यात गुंड रोहित सांडू आणि त्याच्या तीन जवळच्या साथीदारांना चार तासांच्या आत दोन वेगवेगळ्या चकमकीत ठार केले होते.

बांगलादेशी गुंड हमजा यमसदनी : 25 जुलै 2020 रोजी, गँगस्टर टिंकू कपालाच्या डोक्यावर 1 लाख रुपयांचा इनाम पोलिसांनी ठेवला होता. यूपी पोलिस आणि विशेष टास्क फोर्सने यूपीच्या बाराबंकी येथे केलेल्या संयुक्त कारवाईत त्याला यमसदनी पाठवले होते. 18 ऑक्टोबर 2021 रोजी लखनौच्या गोमती नगर भागात उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत बांगलादेशी गुंड हमजा मारला गेला होता. 30 सप्टेंबर 2022 रोजी गँगस्टर विनोद कुमार सिंग बदलापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जौनपूर पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात ठार झाला होता.

दोन आरोपींनी घातल्या गोळ्या : दरम्यान आज 13 एप्रिल 2023 रोजी वकील उमेश पाल यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. गँगस्टरमधून राजकारणी झालेला अतिक अहमदचा मुलगा असद याला उत्तर प्रदेश पोलिसांनी झाशी येथे चकमकीत ठार मारले आहे. वकील उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी असद हा वॉन्टेड होता. या प्रकरणातील आणखी एक आरोपी, गुलाम, त्याच्या डोक्यावर 5 लाखांचे इनाम होते, तो देखील डेप्युटी एसपी नवेंदू आणि विमल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चकमकीत मारला गेला. यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ही कारवाई केली.

हेही वाचा - Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात केलेल्या विधानाबाबत राहुल गांधी यांना 12 जूनपर्यंत दिलासा कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.