ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी; वाचा टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

todays top news
todays top news
author img

By

Published : Feb 15, 2022, 6:27 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • हिजाब प्रकरणी आज पुन्हा सुनावणी

देशभरात वादाचा मुद्दा ठरलेल्या हिजाब प्रकरणी आज कर्नाटक उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहेत. न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  • आज शिवसेनेची पत्रकार परिषद

आज शिवेसेना नेते आणि खासदार संजय राऊत पत्रकार घेणार आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

  • राजू शेट्टी यांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा -

आज राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.

  • गृहमंत्री अमित शहा आज मैनपुरीत सभा घेणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आज मैनपुरी येथे सभा घेणार आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज कनौजमध्ये सभा घेतील. तसेच भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आज पंजाबमध्ये सभा घेणार आहे.

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

कालच्या महत्वाच्या बातम्या -

  • नवी दिल्ली - देशात 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्स ( Corbevax Vaccine In India ) या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात यावी, अशी शिफारस डीसीजीआयच्या कमेटीने दिली आहे. या लसीला मान्यता मिळाली तर 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Corbevax : कोर्बेव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळण्याची शक्यता, डीसीजीआयच्या कमेटीने केली शिफारस

  • गोवा - विधानसभेसाठी 78.94 टक्के मतदान झाले आहे. मात्र, पोस्टल मते विचारात घेतली तर सर्वसाधारणपणे 80 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

Goa Election 2022 : गोव्यात मतदान शांततेत; पोस्टल मतांसह एकूण 78.94 टक्के मतदान

  • पुणे -हिजाब प्रकरणानंतर ( Hijab controversy ) राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असून या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule Statement On Hijab ) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कोण काय कपडे घालणार, हे कोण ठरवणार आहे. आम्ही पुरुषांना विचारतो, का तुम्ही टोपी का घातली, जॅकेट का घातला. मग तुम्ही आम्हाला का विचारता? काय घालायचं हा अधिकार आमचा आहे, आम्ही ठरवू काय घालायचं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांच्या पाणीप्रश्न तसेच टॅक्स प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

Hijab controversy : कोणी काय घालायचं हे ज्याचं त्याला ठरवू द्या, हिजाब प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

  • गोवा - गोव्यामध्ये नेहमी राजकीय स्थिती अस्थिर राहिलेली आहे. गोव्यात आज विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान झाले तब्बल 301 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत 22 जागांपेक्षा जास्त जागा भाजपा मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत व्यक्त करतात. मात्र गोव्यातील राजकीय विश्लेषकांचे मत याहून वेगळे आहे. काँग्रेस सध्या गलितगात्र अवस्थेत असली तरी मागच्या एवढ्याच 17 पेक्षा जागा काँग्रेस मिळवेल, तर भाजपा 14 जागा न पर्यंत जाऊन अन्य पक्षातील आमदारांना गळाला लावून गोव्यात सरकार स्थापन करेल. असा विश्वास राजकीय विश्लेषकांना वाटतो. गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ, अनिल लाड आणि स्नेहल जोशी या तिघांना देखील गोव्यात पुन्हा एकदा स्थिर सरकार येणार नाही असे वाटत आहे.

Goa Assembly Elections 2022 : गोव्यात स्थिर सरकार येणे अशक्य - राजकीय विश्लेषक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.