इंफाळ : पहाटे भारतीय लष्कराच्या 107 व्या प्रादेशिक गटाच्या तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भूस्खलनामुळे अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. मणिपूरमधील जिरीबाम रेल्वे स्टेशन मार्गाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होते. त्यावेळी हे भूस्खलन झाले. यातून लष्कराचे पथक थोडक्यात वाचले.
पहाटे 5 वाजता दरड कोसळून मोठा अनर्थ झाला. मात्र रेल्वे आणि लष्कराच्या पथकाने 13 जणांना वाचवले. बचावकार्यासाठी भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स या भागात तैनात आहेत.
जखमी सैनिक आणि इतरांना नोनी आर्मीच्या वैद्यकीय पथकाने लष्कराच्या वैद्यकीय शिबिरात दाखल केले. दिमापूर येथील लष्कराच्या 3ऱ्या कॉर्प्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, सकाळी भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे आले. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर सज्ज असल्याचे लष्कराने सांगितले. अनेकजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.