चंदीगड (पंजाब) - पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या हत्येप्रकरणी 10 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. हे सर्व जण लॉरेन्स गँगशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. हे शार्पशूटर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील असल्याचीही माहिती समोर आली आहे.
एका संशयिताला अटक - या शार्प शूटर्सच्या शोधासाठी पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील एक नेमबाज राजस्थानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब पोलिसांव्यतिरिक्त दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमधील पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दविंदर उर्फ काला नावाच्या तरुणाला अटक केली आहे. फतेहाबाद पोलीस ठाण्यात दविंदर विरोधात एनडीपीएसचे सहा गुन्हे दाखल केले आहेत तर पंजाबमध्ये दविंदरविरोधात 2 किलो अफू जप्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस उच्च न्यायालय जाण्याच्या तयारीत - पंजाबमधील मनसा जिल्ह्यात काँग्रेस नेते आणि गायक मुसेवाला ( वय 28 वर्षे) यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. सिद्धू मुसेवाला खूनप्रकरणी काँग्रेस उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने मुसेवाला यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण घेऊन पंजाब काँग्रेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने एक दिवस आधीच त्यांची सुरक्षा काढून घेतली होती.
हेही वाचा - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन, दोन संशयित पुण्याचे असल्याचा अंदाज