विजयादशमीनिमित्त श्रीमहालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची खास साडी; पाहा व्हिडीओ - 16 KG GOLD SAREE
Published : Oct 12, 2024, 2:28 PM IST
पुणे : मागील 23 वर्षांपासून परंपरेनुसार विजयादशमीनिमित्त पुण्यातील श्रीमहालक्ष्मी मंदिरात देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात येत आहे. पुण्यातील सारसबाग येथील श्रीमहालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीला ही साडी परिधान केली जाते. त्यानुसार आज (12 ऑक्टोबर) देखील देवीला ही साडी परिधान करण्यात आलीय. श्रीमहालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्रीबन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टतर्फे देवीला ही सोन्याची साडी नेसवली जाते. देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आल्यानं मंदिरात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केल्याचं बघायला मिळतंय. नवरात्रनिमित्त उत्साहाचं वातावरण दिसून आले. दरम्यान, दक्षिण भारतातील कारागिरांनी 23 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली होती. ही साडी तयार करायला सुमारे 6 महिने लागतात.