महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बंदुकधारी दरोडेखोरांवर सराफाचा धैर्यानं लाठी घेऊन हल्ला, नागरिकांच्या मदतीनं एकाला अटक - Thane Crime News - THANE CRIME NEWS

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 9:18 PM IST

ठाणे : ठाण्यातील बाळकूम भागाती एका सराफाला दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु सराफानं प्रतिकार केल्यानं चौघांनी पळ काढला. लाठी घेऊन सराफानं पाठलाग केल्यानंतर मदतीला धावलेल्या नागरिकांनी एका दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या तावडीत दिलं.  तर अन्य तिघंजण दरोडेखार पसार झाले. बाळकूम नाका, पाडा नं. 2 येथील दर्शन ज्वेलर्स या दुकानात बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर सोनं आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये  सहभाग असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकं कार्यरत असून, ठाणे शहरात नाकाबंदी करण्यात आलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details