महाराष्ट्र

maharashtra

शेवगावमध्ये संतप्त आंदोलन, बस स्थानकाच्या डबक्यात संजय नांगरे यांनी केला चिखलाचा अभिषेक - mud bath in potholes

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 10:11 AM IST

Updated : Aug 21, 2024, 1:10 PM IST

संजय नांगरे यांनी केला चिखलाचा अभिषेक (Etv Bharat Reporter)

अहमदनगर Mud Bath In Potholes - जिल्ह्यातील शेवगाव बस स्थानकाचं बांधकाम गेल्या सहा-सात वर्षापासून संथ गतीनं सुरू आहे. त्यातच पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे बस स्थानकामध्ये साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे हाल होत आहेत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी शेवगाव बस स्थानकातील पाणी साचलेल्या खड्ड्यामध्ये बसून चिखलाने अभिषेक केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे तसंच सरचिटणीस बाळासाहेब फटागरे यांनी आंदोलक संजय नांगरे यांना दुधाचा अभिषेक घातलाय. यावेळी बोलताना संजय नागरे यांनी बसस्थानाकाचा कुणी वालीच राहिला नसल्याच्या आशयाचं गाऱ्हाणं मांडलं. नेते येतात, सभा घेतात. मात्र लोकांच्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष जात नाही. त्यामुळे या समस्येकडं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं. पाहा व्हिडिओ...

Last Updated : Aug 21, 2024, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details