महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महेश गायकवाड यांची प्रकृती कशी आहे? शंभूराज देसाई यांनी दिली महत्त्वाची माहिती - शंभुराज देसाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 8:05 PM IST

ठाणे Shambhuraj Desai : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात जखमी झालेले शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची आज (4 फेब्रुवारी) ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. (Mahesh Gaikwad) गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांची प्रकृती थोडी नाजूक असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. (Mahesh Gaikwad firing case) महेश गायकवाड यांना बरं करण्याचे प्रयत्न डॉक्टर करत आहेत.  आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, असं आवाहन देसाईंनी सर्वांना केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या हृदयाला पडलेली छिद्र बंद करण्याच्या तब्बल सहाशे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यातील जवळपास दीडशे शस्त्रक्रिया लवकरच सुरू होणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. वाढदिवसानिमित्त जास्त बडेजाव न करता रुग्णांसाठी काम करा, असं मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश असल्यानं त्याची अंमलबजावणी खासदार शिंदे करत असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details