जळगावमध्ये भरधाव कारनं 5 महिला 2 चिमुकल्यांना उडवलं, एक ठार; जमावाकडून कार चालकाला बेदम मारहाण - Jalgaon Accident - JALGAON ACCIDENT
Published : Jul 19, 2024, 1:08 PM IST
जळगाव Jalgaon Accident News : जळगावातील मेहरुण परिसरातील मंगलपुरीत घरासमोर उभं राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुकल्यांना भरधाव कारनं जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (18 जुलै) सायंकाळी 6:30 वाजता घडली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार महिला आणि मुलं गंभीर जखमी झालेत. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त जमावाने कार चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर पोलीस तपासादरम्यान कार चालक पवन कैलास पाटील (वय 25, रा. सप्तशृंगी कॉलनी, मेहरुण, जळगाव) हा नवशिक्या असल्याचं समोर आलंय. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपीला कारसह एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं.