लोकसभा निवडणूक 2024 ; 'यावेळी मी साडेतीन लाख मतांनी निवडून येणार', रावसाहेब दानवेंचा दावा - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
Published : Apr 12, 2024, 2:23 PM IST
जालना Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच आता भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी "मी या पंचवार्षिकला तीन ते साडेतीन लाख मतानं विजयी होणार आहे, असा दावा केला. या वर्षाची निवडणूक ही विकासाच्या आणि देशाच्या हितावर लढली जाणार आहे," असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहे. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रावसाहेब दानवे हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. यंदाही भाजपानं त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. त्यामुळं "जिल्ह्यात केलेला विकास या मुद्द्यावर मी पुन्हा जनतेसमोर जात असून राजकीय जीवनात लोकसभेत षटकार मारणार," असा दावा दानवे यांनी केला. "2009 काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे डॉक्टर कल्याण काळे यांनी मला थोडी टक्कर दिली होती. मात्र आता यामध्ये बऱ्याच वर्षाचं आंतर पडलं असून यामध्ये मी मतदार संघात भरघोस विकासकामं केली आहेत. प्रत्येक नागरिकाच्या मनामनात घराघरात मी पोहोचलो. त्यामुळे या पंचवार्षिकला सुद्धा मतदार राजा आपला कल माझ्या बाजुनंच देणार आहे," असा दावा यावेळी दानवे यांनी केला.