निवडणुकीत 'दाजी' घोटाळा करतील, त्यांना घरात कोंडून ठेवा; 'या' राजेंचा लाडक्या बहिणींना सल्ला, पाहा व्हिडिओ - Ladki Bahin Yojana - LADKI BAHIN YOJANA
Published : Oct 3, 2024, 2:29 PM IST
सातारा Shivendra Raje On Ladki Bahin Yojana : काही दिवसातच राज्यात विधानसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजणार असल्यानं राजकीय नेते निवणुकीच्या तयारीला लागले आहेत. मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. शासकीय योजनांच्या कार्यक्रमात देखील प्रचाराची संधी साधली जात आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील मेढा याठिकाणी 'राष्ट्रीय पोषण आहार' अभियान अंतर्गत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लाडक्या बहिणींना मिश्कील सल्ला दिलाय. "महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचं काम केलंय. अंगणवाडी सेविकांना पगारवाढ दिली आहे. आता लाडक्या बहिणींनी भावांवर लक्ष ठेवावं. विधानसभा निवडणुकीवेळी दाजी घोटाळा करतील तर दाजींना घरात बांधून, कोंडून ठेवा. भाच्चे कंपनी काही उद्योग करायला जातील. त्यांनाही कोंडून ठेवा," असं आमदार शिवेंद्रराजे म्हणाले. त्यांच्या या मिश्कील सल्ल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.