साने गुरुजींच्या कर्मभूमीत 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, पाहा व्हिडिओ - Amalner Sahitya Sammelan
Published : Feb 2, 2024, 6:07 PM IST
जळगाव Marathi Literature Conference : जळगाव जिल्ह्यातील साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे प्रताप महाविद्यालय येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहेत. (Amalner) या साहित्य संमेलनाच्या आज (2 फेब्रुवारी) लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. या साहित्य संमेलनासाठी अमळनेर सजली आहे. (Granthadindi) या ठिकाणी तीन सभामंडप, ३०० गाळे असलेलं भव्य ग्रंथ दालन, खान्देशी खाद्यपदार्थांचं दालन, चित्र प्रदर्शन, सेल्फी पॉईंट यांचा समावेश असलेली पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीची उभारणी करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला संत सखाराम महाराज यांच्या देवस्थानापासून आज सकाळी साहित्यिक, विद्यार्थी आणि अंमळनेर येथील नागरिकांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यानंतर प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. देशभरातून साहित्यिक या साहित्य संमेलनासाठी दाखल झाले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या साहित्य संमेलनाकडे लागले आहे.