हैदराबाद : टाटा मोटर्सनं त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टियागो ईव्ही आणि टिगोरसह एंट्री लेव्हल कार टाटा टियागोला अपडेट केलंय. कंपनीनं 2025 या मॉडेलमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन डिझाइन आणि नवीन रंग पर्याय दिले आहेत. कंपनीनं टियागो, टियागो ई, व्ही आणि टिगोरसाठी बुकिंग देखील सुरू केली आहे. 2025 टियागोची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये, टियागो ईव्हीची किंमत 7.99 लाख रुपये आणि टिगोरची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून आहे. कंपनीनं 2025 टियागो पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच केलीय. कारमध्ये एमटी आणि एएमटी पर्याय उपलब्ध आहे.
2025 टाटा टियागो
2025 च्या टाटा टियागो आवृत्तीमध्ये फ्रंट ग्रिलच्या खालच्या भागात एक नवीन पॅटर्न आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. अलॉय व्हील्सची रचना पूर्वीसारखीच आहे. एलईडी हेडलाइट्स आणि डीआरएल अपडेट केले आहेत. आतील भागात नवीन रंगसंगती आणि मेलेंज फॅब्रिक अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाले तर, त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,सीट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळेल. या हाय-एंड व्हेरियंटमध्ये 10.25 इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील असेल.
सुरक्षेसाठी ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज
2025 टाटा टियागोमध्ये कोणतेही यांत्रिक बदल केलेले नाहीय. यात 1.2 लिटर इनलाइन थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 82bhp पॉवर आणि 144Nm टॉर्क जनरेट करतं, जे 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. यामध्ये ग्राहकांना सीएनजीचा पर्यायही मिळेल. सुरक्षेसाठी, त्यात ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज, ABS, EBD, TPMS आणि ESC मिळेल. 2025 टाटा टियागोच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे. XT व्हेरिएंटची किंमत 30 हजारांनी वाढवण्यात आली आहे.