मुंबई Budget Impact on Share Market : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर (Union Budget 2024) करण्यात आला. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काही मिळाले नसले तरी, बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या घोषणा झालेल्या आहेत, अशी टीका विरोधक करत आहेत. तसेच दुसरीकडं अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारानं उसळी घेतली होती. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात कमालीची घसरण झालेली दिसून आली.
काय कारणं असू शकतात? : मंगळवारी सकाळी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी दिसून आली. यावेळी गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी राहिल असं बोललं जात होतं. मात्र, अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली आहे. दरम्यान, शेअर बाजार जवळपास 1200 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये 241 अंकांची घसरण झालेली आहे. दुसरीकडं लाँग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये मोठी वाढ झाली आहे. शॉर्ट टर्म पंधराचा वीस झाला आणि लाँग टर्म 10 चा 12.30 झाला. याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे, असं शेअर बाजार अभ्यासक निखिल सोमण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतना म्हटलं आहे.