महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केनियातून भारतात सोन्याची तस्करी? दोन केनियन महिलांना मुंबई विमानतळावर अटक

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजेंस युनिटनं सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली 2 केनियन महिलांना अटक केलीय. त्यांच्याकडून सुमारे 2 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय.

Gold Smuggling
Gold Smuggling

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 11:44 AM IST

मुंबई Gold Smuggling : एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) नं 2 केनियन महिलांना 2 कोटींच्या सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केलीय. एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) नं केनियातील दोन महिलांना 2 कोटी 2 लाख रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली पकडण्यात यश मिळविलंय. खदिजा तुलू आणि नजमा मोहम्मद शेख अशी या महिलांची नावं आहेत.

सुमारे दोन कोटींचं सोनं जप्त : एअर इंटेलिजेंस युनिटच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलांना 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आलं. यात नैरोबीहून आलेल्या तुलूकडं 2442 ग्रॅम सोनं सापडले. ज्याची किंमत 1.30 कोटी इतकी आहे. भारतीय बाजारपेठेत विक्री करण्याच्या उद्देशानं नैरोबीमध्ये क्रेडिटवर सोनं घेतल्याचं तिनं कबूल केलं. तर दुसऱ्या कारवाईत नजमा मोहम्मद शेख ही देखील नैरोबीहून प्रवास करत असताना तिच्याकडं 2950 ग्रॅम सोनं आढळून आलं. या सोन्याची किंमत 1.58 कोटी रुपये इतकी आहे. भारत आणि केनियामधील किंमतीतील फरकातून फायदा मिळवण्याच्या उद्देशानं तिनं नैरोबीमध्ये स्थानिक पातळीवर सोनं खरेदी केल्याचं कबूल केलंय.

आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी : ओळख नसलेल्या या दोन संशयितांचा आर्थिक फायद्यासाठी सोनं विकण्याचा समान हेतू असल्याचं पोलिसांनी उघड केलंय. या दोन्ही महिलांचे केनियामध्ये व्यवसाय आहेत. आरोपीची बाजू मांडणारे वकील प्रभाकर त्रिपाठी यांनी सांगितलं की, पोलिसांनी अद्याप कोणतीही वस्तू जप्त केलेली नाही. अधिकारी आणि संशयित यांच्यातील कम्युनिकेशनमुळं निर्माण झालेला अडथळा अधोरेखित केला. त्रिपाठी यांनी जबाब मागं घेण्यासाठी आणि जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या दोन आरोपींना सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करत अटक करण्यात आलीय. आरोपीना कोर्टात हजर केलं असता एस्प्लेनेड कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलीय.

हेही वाचा :

  1. कहरच! पँट, बनियानमध्ये लपवून सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावर १ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
  2. म्यानमारमधून कमरेला बांधून आणली सोन्याची 20 बिस्कीट; सांगलीतील एकासह दोन तस्करांना वाराणसीत अटक
  3. Gold Smuggling Case Mumbai: 'डीआरआय'ने सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा केला पर्दाफाश, ७ किलो सोने जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details