ठाणे Iqbal Kaskar : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) विशेष न्यायालयानं बुधवारी फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरची खंडणी प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलीय. ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमित एम. शेटे यांनी केसकरवरील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरल्यानं त्यांची निर्दोष मुक्तता करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं.
इतर आरोपी फरार : कासकरवर ठाणे नगर पोलिस ठाण्यात MCOCA च्या कलम 3 तसंच भारतीय दंड संहितेच्या कलम 384 (खंडणी),386 (मृत्यूची भीती दाखवणे) नुसार गुन्हा दाखल केला होता. सदरचं प्रकरण विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित एम. शेटे यांच्या न्यायल्यात सुरू होतं. मुंबईच्या गोराई परिसरातील 38 एकर जागेच्या सौदयात 3 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडं गुन्हा दाखल झाला होता. सादर प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आरोपी इक्बाल कासकरच्या वकीलानं सांगितलं इक्बाल कासकर अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगात आहे. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित शेट यांनी त्याची निर्दोष मुक्तता केलीय. उर्वरित आरोपी दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम हे अद्याप फरारी आहेत.