मुंबई : 20 व्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला आज (19 जाने.) पहाटे सुरुवात झालीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. या स्पर्धेत तब्बल 63 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळून या स्पर्धेला सुरुवात झालीय.
फुल मॅरेथॉनमध्ये हौशी धावपटूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय. तर अर्ध मॅरेथॉन, पोलीस चषक, ओपन 10K, पुरुष आणि महिलांसाठी एलिट शर्यती, अपंग चॅम्पियन्स, ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन आणि ड्रीम रन अशा विविध प्रकारात ही स्पर्धा होणार आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात (ETV Bharat Reporter) 63 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी : फुल मॅरेथॉन ओपन कॅटेगिरीमध्ये 12,000 हून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. तर, सुमारे 15,000 धावपटू अर्ध-मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. ओपन 10K मध्ये सुमारे 8,500 धावपटू मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहेत. तर, ड्रीम रनमध्ये 25,000 पेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक रनमध्ये 1,894 धावपटू धावणार आहेत. तर अपंग चॅम्पियन कॅटेगरीमध्ये सुमारे 1,100 धावपटू धावतील. असे एकूण 63 हजाराहून अधिक स्पर्धक आज मुंबईच्या रस्त्यावर दिसणार आहेत.
सहभागी स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी संपूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या मार्गावर 15 वैद्यकीय केंद्रं आणि तीन वैद्यकीय आधार उभारण्यात आली आहेत. तर, या मार्गावर विविध ठिकाणी सहा मिनी मेडिकल कॅम्पदेखील उभारण्यात आले आहेत. सोबतच, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपीचे 160 कार्डियाक आणि स्पोर्ट्स रिहॅब फिजिओथेरपिस्टचे पथक शेवटच्या 10 किलोमीटर अंतरावर सर्व खेळाडूंचे निरीक्षण करणार आहेत. तर शेवटच्या दोन किलोमीटरमध्ये प्रत्येक 100 मीटरवर स्पॉटर तैनात केले गेले आहेत.
हेही वाचा -
- टाटा मॅरेथॉनदरम्यान 75 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
- इथोपियाच्या हायली लेमीनं पटकावलं टाटा मॅरेथॉनचं विजेतेपद, वाचा विजेत्यांची यादी एका क्लिकवर
- 18th Tata Marathon : सीमेवर कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेले सैनिक मॅरेथॉमध्ये सहभागी