महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात जाळपोळ आणि दगडफेक; दोन गटात उसळली दंगल, परिसरात तणाव

अकोला शहरात दोन गटात हाणामारी होऊन जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलीय. या दगडफेकीत अनेक नागरिक जखमी झालेत.

RIOT BETWEEN TWO GROUPS
अकोल्यात दोन गटात राडा (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2024, 9:12 PM IST

Updated : Oct 7, 2024, 10:04 PM IST

अकोला : अकोल्यात दोन गटात झालेल्या हाणामारीत जुने शहरातील हरिहर पेठ भागात दंगल उसळली. ऑटो आणि दुचाकीच्या धक्क्यावरून दोन गटात हा राडा झाला. या घटनेनंतर मोठा पोलीस फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला होता. नवरात्रीच्या उत्सवादरम्यान घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. यामध्ये काहीजण जखमी झालेत तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांकडून लाठीचार्ज : याबाबत अधिक माहिती अशी की, हरिहर पेठ भागात ऑटो आणि दुचाकीच्या धडकेवरून दोन गट समोरासमोर आले. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनेक नागरिक जखमी झाले. तर काही वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फोजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह घटनास्थळावर दाखल झाले. दगडफेक करणाऱ्या व वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (Source - ETV Bharat Reporter)

भाजपाचे आमदार घटनास्थळी दाखल :अकोल्यात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. दंगलीची माहिती आपण गृहमंत्र्यांना दिली. शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणीही केल्याचं रणधीर सावरकर यांनी सांगितलं.

अकोला दंगलीचं केंद्र? : 15 मे 2024 च्या दरम्यान अकोल्यात दंगल उसळली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दंगल झाली. त्यामुळं अकोला हे दंगलीचं केंद्र बनत आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धार्मिक पोस्टवरून अकोल्यातील जुने शहर परिसरात मे 2023 मध्ये हाणामारी झाली होती.

हेही वाचा

  1. 'त्यांना' जाळ्यांशिवाय असलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावलं पाहिजे; राज ठाकरे कडाडले
  2. नागपूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांवर मनोरुग्णानं केला हल्ला; दोघांचा जागीच मृत्यू - Nagpur Railway Station Attacked
  3. पालघरमध्ये माकडानं आत्महत्या केल्याची अफवा; खरं कारण आलं समोर - Monkey Dies In Accident
Last Updated : Oct 7, 2024, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details