महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उजनी जलशायात बेपत्ता झालेल्या सहा जणांचे सापडले मृतदेह, नातेवाईकांचा आक्रोश - Ujani Jalshaya - UJANI JALSHAYA

UJANI JALSHAYA : उजनी धरणाच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीतील बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचे मृतदेह गुरुवारी सकाळी तरंगत पाण्यावर आले. मृतदेह पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 1:14 PM IST

सोलापूर UJANI JALSHAYA :उजनी धरणात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीतील सहा जण बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह आज सकाळी तरंगत पाण्यावर आले. सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा प्रशासन बेपत्ता झालेल्याचा शोध घेत होते. गुरुवारी सकाळी एनडीआरएफच्या टीमने शोध कार्य सुरु केल्यानंतर मृतदेह तरंगताना आढळले आहेत. ज्या ठिकाणी बोट बुडाली होती, त्याच परिसरात पाण्यात तरंगताना सहा जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेतील गौरव धनंजय डोंगरे याचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर बोट उलटलेच्या ठिकाणापासून काही अंतरावर हे सर्वच मृतदेह सापडले आहेत. सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले जाणार आहे. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

सहा मृतांचे शव पाहून आक्रोश : कुगाव येथील ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक) व गौरव धनंजय डोंगरे (वय २४) तर झरे (ता करमाळा) येथील गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष) हे बेपत्ता झाले होते. चोवीस तासांपासून उजनी जलाशयात बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला जात होता. गुरुवारी सकाळी बेपत्ता झालेले सर्व मृतदेह सापडले आहेत. मृतदेह पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. कुगाव आणि झरे गावात ग्रामस्थांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.

हेही वाचा

  1. उजनी धरणात बोट बुडाल्यानं सहा जण बेपत्ता, धाडसानं पोहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे वाचले प्राण - Ujani dam news
  2. Ujani Dam Issue : उजनीचे पाणी नेमकं कोणी पळवलं?; वाचा, काय आहे प्रकरण...

ABOUT THE AUTHOR

...view details